Social Viral: सोशल मीडियावर सध्या सिविक सेन्स नावाचा एक विचित्र ट्रेंड गाजतोय. एखादी व्यक्ती रील शूट करत असताना मागून कुणी आले की त्याला सिविक सेन्स नाही असं म्हटलं जातं. पण आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने या ट्रेंडला यूनो रिव्हर्स मोडवर आणलं आहे. म्हणजेच, दुसऱ्याला शहाणपण शिकवणाऱ्या रील बहाद्दरांनाच नेटकऱ्यांनी आरसा दाखवला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चालत्या कारच्या डॅशकॅममधून रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरुण आणि तरुणी हायवेसारख्या गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध बसून मोठ्या आरामात रील बनवत आहेत. त्यांच्या बाजूला त्यांची बाईक उभी आहे. भरधाव गाड्यांच्या या रस्त्यावर आपलं कृत्य कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो, याचं साधं भानही या जोडप्याला नव्हतं.
तितक्यात मागून एक कार वेगाने येते. कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याने ऐनवेळी इमर्जन्सी ब्रेक लावले, अन्यथा त्या कपलला गंभीर दुखापत झाली असती किंवा त्यांचा जीवही गेला असता. सामान्यतः रील बनवणारे लोक इतरांना सिविक सेन्स नसल्याचं बोलतात. पण इथे रील बनवणारेच रस्ता अडवून बसले होते. इथे ड्रायव्हरने गाडी मध्ये आणून त्यांचा फ्रेम बिघडवली नाही, तर त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे इथे सिविक सेन्सची खरी कमतरता रील बनवणाऱ्यांमध्येच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या कपलला चांगलंच धारेवर धरलं आहे. एका युजरने हा सिविक सेन्स नाही, हा तर वेडेपणा आहे, असं म्हटलं. तर आणखी एका युजरने, दुसऱ्याला फ्रेम बिघडवली म्हणून दोष देणाऱ्यांनी आधी स्वतःचं भान ठेवावं, असं म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने रीलसाठी लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी," असं म्हटलं आहे.
Web Summary : A couple filming a reel on a busy road narrowly escaped a serious accident. The driver's quick braking saved them, exposing the irony of those prioritizing reels over safety and civic responsibility. Netizens criticized the couple's reckless behavior.
Web Summary : एक व्यस्त सड़क पर रील बनाते समय एक कपल गंभीर दुर्घटना से बाल-बाल बच गया। ड्राइवर के त्वरित ब्रेक लगाने से वे बच गए, जिससे सुरक्षा और नागरिक जिम्मेदारी से अधिक रीलों को प्राथमिकता देने वालों का विरोधाभास उजागर हुआ। नेटिज़न्स ने कपल के लापरवाह व्यवहार की आलोचना की।