शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: दिवाळीत फुटला सर्वात मोठा गल्ला; कटरने सिलेंडर कट करताच १० रुपयांच्या नाण्यांचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:42 IST

साठवलेली नाणी बाहेर काढण्यासाठी चक्क हे सिलेंडर इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने कट करण्यात आलं आहे. 

सोशल मीडियामुळे अनेकांच्या अनेक तऱ्हा लोकांपर्यंत पोहोचत आहेत. लहान-सहान क्रिएटीव्ह कामंही व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात. तर, अनेकदा इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर लपवलेले पैसेही कुठून बाहेर येतील हे सांगता येत नाही. त्याचप्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क सिलेंडरच्या टाकीमध्ये १० रुपयांची नाणी साठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही साठवलेली नाणी बाहेर काढण्यासाठी चक्क हे सिलेंडर इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने कट करण्यात आलं आहे. 

चिल्लर पैसे साठवण्यासाठी लहानपणी गल्ला वापरला जात, या गल्ल्यात काही रक्कम साठल्यानंतर किंवा हा मातीचा गल्ला भरल्यानंतर तो फोडून त्यातील पैसे बाहेर काढण्यात येत. दिवाळीच्या सुट्टीत नेहमी हा अनुभव अनेक घरांमध्ये दिसून येतो. मात्र, चक्क गॅस सिलेंडरच्या टाकीत १०-१० रुपयांची नाणे साठवण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, अनेकांना प्रश्नही पडला आहे की, नेमकं सिलेंडरमध्ये नाणी टाकली कुठून?. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करुन नेटीझन्स मजा घेत आहेत. 

tusharghongade1234 या इंस्टाग्राम अकांउटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ''जर चुकीचा सिलेंडर कापला असता तर…'', असं कॅप्शन या इंस्टा अकाऊंटवरुन लिहिण्यात आलं आहे. या व्हिडिओवर एकाने कमेंट करुन, ''२०२३चा सर्वात मोठा गल्ला'', असं लिहिलं आहे. तसेच, इन्कम टॅक्स विभागाला कळवले पाहिजे, अशी मजेशीर कमेंटही एक युजर्सने केली आहे. तर, यात पैसे टाकले कसे?, असा प्रश्नही एका युजरला पडला आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलCylinderगॅस सिलेंडरInstagramइन्स्टाग्राम