वेळ आली की, हिरोसारखे संकटांना समोर जाणारे लोक आपण अनेक वेळा प्रत्यक्षातही बघत असतो. अशाच एक प्रसंगाचा प्रत्यय देणारा एक सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. एका लहान मुलीने दाखवलेल्या विलक्षण धैर्यामुळे दोन चिमुकल्यांचे प्राण वाचले. लिफ्टचे दरवाजे अचानक बंद होत असताना आणि आत दोन लहान चिमुकले अडकणार असतानाच, बाहेर उभ्या असलेल्या एका चिमुकलीने स्वतः ढाल बनवत, जीवाची बाजी लावत या दोन्ही मुलांना वाचवले.
मुलीच्या प्रसंगावधानाला आणि धाडस सॅल्यूट -व्हिडिओमध्ये दिसते की, दोन लहान मुली लिफ्टच्या आत आहेत आणि एक मोठी मुलगी बाहेर उभी राहून त्यांच्याशी बोलत आहे. अचानक लिफ्टचे दरवाजे बंद होऊ लागतात. धोका ओळखून बाहेरची मुलगी क्षणाचाही विलंब न करता आपले शरीर दरवाजांमध्ये घालते. सामान्यतः सेन्सरमुळे दरवाजे थांबणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. तरीही न डगमगता तिने संपूर्ण शक्तीनिशी दरवाजे रोखून धरले.
लोकांच्या मदतीने सुटका -हा संपूर्ण प्रकार बघताच आसपासच्या दोन महिला धावून आल्या. सेन्सर निकामी ठरल्याने त्यांनी हात आणि पायांच्या मदतीने दरवाजे बाजूला सारले. काही सेकंदांच्या थरारानंतर दोन्ही मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मुले बाहेर येताच लिफ्टचा दरवाजा क्षणात बंद झाला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मुलीच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.
Web Summary : A young girl's quick thinking saved two children from being trapped in a closing elevator. She bravely blocked the doors with her body until others helped. The incident, captured on CCTV, is being widely praised.
Web Summary : एक छोटी लड़की की समझदारी से दो बच्चे लिफ्ट में फंसने से बच गए। उसने बहादुरी से अपने शरीर से दरवाज़े को रोका जब तक कि दूसरों ने मदद नहीं की। सीसीटीवी में कैद घटना की खूब सराहना हो रही है।