Viral Video Rickshaw Automatic Parking: कधी कधी अशा घटना घडतात, ज्याचा विचार करूनही माणसाला धक्का बसतो. स्वतःच्या डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहूनही त्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होते. सोशल मीडियावर असेच काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक सायकल रिक्षा स्वतःहून रस्त्यावर जाते आणि आपोआप पुन्हा पार्किंग केल्यासारखी रस्त्याच्या कडेला उभीही राहते.
सहसा कोणतेही वाहन एखाद्या ड्रायव्हरविना चालत नाही. तुम्ही रस्त्यावर अनेक ई-रिक्षा आणि सायकल रिक्षा पाहिल्या असतील. कार आणि इतर वाहनांप्रमाणे, त्यादेखील ड्रायव्हर चालवतो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिक्षा स्वतःहून रस्त्यावर धावू लागते आणि पुन्हा येऊन पार्क केल्यासारखी उभी राहते. तुफान पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे खरंतर असं घडताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं. पण सुरूवातीला हे व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. पाहा व्हिडीओ-
टेस्ला कंपनीने नुकतीच ड्रायवर विना चालेल अशी एक कार लाँच केली. त्यामुळे गमतीशीर पद्धतीत ही रिक्षा देखील टेस्ला कार सारखीच आहे का, असा सवाल नेटकरी विचारताना दिसत आहेत. हे मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर भरपूर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंना आतापर्यंत हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून शेकडो लोकांनी लाईकही केलं आहे.