सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक स्विगी डिलिव्हरी राइडर ग्राहकांसोबत बसून जेवताना दिसत आहे. सुरुवातीला सर्व काही नॉर्मल वाटतं, परंतु काही क्षणांतच हा व्हिडीओ भावुक वळण घेतो. जेवता जेवता राइडरच्या डोळ्यात पाणी येतं. तो ढसाढसा रडायला लागला.
डिलिव्हरी बॉय सांगतो की, त्याने सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. घरातून निघताना तो फक्त एक कप चहा प्यायला होता. दिवसभर डिलिव्हरीचच कामं पूर्ण करताना त्याला जेवायला वेळच मिळाला नाही आणि तो उपाशीपोटी काम करत राहिला.
व्हिडिओमध्ये तो आपल्या कुटुंबाबद्दलही सांगतो. तो म्हणतो की, त्याला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलांच्या जबाबदारीमुळे तो सातत्याने मेहनत करत असतो. ग्राहकांनी त्याला आधी आरामात जेवण करण्यास सांगितलं आणि नंतर त्याच्या घरच्यांसाठीही काही जेवण पॅक करून दिलं.
"ही एका मध्यमवर्गीय वडिलांची खरी परिस्थिती आहे, जो आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी अनेकदा स्वतःची भूक विसरून जातो" असं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. ही बाब अनेकांना भावूक करून गेली आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्या ग्राहकांचे कौतुक केलं की त्यांनी राइडरला जेवण दिलं. तर दुसरीकडे, काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, कोणाच्या तरी भावूक परिस्थितीचं रेकॉर्डिंग करून ते इंटरनेटवर टाकणं योग्य आहे का? मात्र, अनेकांनी या व्हिडिओचं समर्थन केलं आहे.
Web Summary : A Swiggy delivery rider, working tirelessly to provide for his children, broke down while eating with a customer. He hadn't eaten all day, prioritizing his family's needs over his own. The viral video sparked debate about sharing such personal moments online.
Web Summary : अपने बच्चों के लिए अथक प्रयास करने वाला एक स्विगी डिलीवरी राइडर, एक ग्राहक के साथ खाते समय टूट गया। उसने पूरे दिन कुछ नहीं खाया था, अपने परिवार की जरूरतों को अपनी ज़रूरतों से ऊपर रखा। वायरल वीडियो ने ऐसे निजी पलों को ऑनलाइन साझा करने पर बहस छेड़ दी।