Viral VIdeo: सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. खासकरुन तरुणांमध्ये कार आणि बाइक्सचे स्टंट करण्याची क्रेझ असते. पण, कधी-कधी असे स्टंट अंगलटही येतात. अशीच घटना सुरतच्या डुमस बीचवर घडली आहे. एका तरुणाने स्टंटसाठी आपली Mercedes-Benz C220 कार थेट समुद्रात उतरवली, मात्र काही मिनिटांतच लाटांनी कारला वेढा घातला. कार वाळूत अडकल्याने मोठी फजती झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आपल्या मर्सिडीज कारने बीचवर स्टंट करत होता. सुरुवातीला सगळं सामान्य दिसत होतं, पण काही वेळातच समुद्राच्या लाटा वाढल्या आणि गाडीचे चाक वाळूत खोलवर अडकले. तरुणाने कार पुढे काढण्याचा प्रयत्न केला, पण गाडी आणखी फसत गेली. काही मिनिटांतच 60 लाखांची लक्झरी कार पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडाली.
क्रेनद्वारे कार बाहेर काढली
बीचवर उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोठी क्रेन बोलावली. व्हिडिओमध्ये दिसते की, दोरींच्या साहाय्याने कारला समुद्रातून बाहेर ओढण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणावर तीव्र टीका केली.
Mercedes C-Class ची किंमत आणि फीचर्स
भारतामध्ये Mercedes-Benz C-Class ही लक्झरी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. या मॉडेलची किंमत सुमारे ₹60 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. यात 6 ते 8 एअरबॅग्ज, ADAS, लेझर आणि रडार आधारित सुरक्षा प्रणाली, प्रीमियम सस्पेन्शन आणि अत्याधुनिक इंफोटेनमेंट सिस्टीम अशा अनेक उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात.
Web Summary : A Surat youth's car stunt backfired when his Mercedes got stuck in the sea. The luxury car was submerged after waves engulfed it. Police arrested the 18-year-old driver and are investigating the incident.
Web Summary : सूरत में एक युवक का कार स्टंट उस समय उल्टा पड़ गया जब उसकी मर्सिडीज समुद्र में फंस गई। लहरों में घिरने के बाद लग्जरी कार डूब गई। पुलिस ने 18 वर्षीय ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच कर रही है।