शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Steve Waugh, Varanasi Ganga: ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटर स्टीव्ह वॉ याने मित्राच्या अस्थींचं गंगेत केलं विसर्जन; जुना फोटो पुन्हा होतोय व्हायरल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:21 IST

स्टीव्ह वॉ याने मित्राची शेवटची इच्छा पूर्ण केली.

Steve Waugh, Varanasi Ganga: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्टीव्ह वॉ याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. फोटोमध्ये स्टीव्ह वॉ बनारसच्या पवित्र गंगा नदीत अस्थी विसर्जित करताना दिसतोय. हिंदू चालरिती, रूढी आणि परंपरा यांना मानणारा खूप मोठा वर्ग भारताबाहेरही आहे. अनेक परदेशी खेळाडू, सेलिब्रिटी पहिल्यांदा भारतात आले की पुढे कायम येत जात राहतात. भारतातील संस्कृतीचा हेवा वाटतो असं अनेक परदेशी पर्यटक सांगतात. स्टीव्ह वॉ मात्र पर्यटनासाठी न येता त्याच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आला होता. पण या फोटोचा Shane Warne याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा फोटो नक्की कधीचा फोटो, त्याबद्दल जाणून घेऊया.

फोटो नक्की केव्हाचा आहे?

स्टीव्ह वॉचा बोटीतून नदीत अस्थि विसर्जन करत असतानाचा एक फोटो व्हायरल झालाय. तो फोटो २०१७ सालचा आहे. तो त्याच्या काही साथीदारांसह बनारसला आला होता, त्यावेळी त्याने हिंदू रितीरिवाजांनुसार आपला मित्र ब्रायन याच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या होत्या. चित्रात ब्राह्मणांसमवेत तो घाटावर बोटीत उभा राहून गंगेत अस्थींचे विसर्जन करताना दिसला. स्टीव्ह वॉ चा मित्र ब्रायन हा मोची होता. त्याच्या कुटुंबात कोणीही नव्हतं. सिडनीच्या ब्रायनची शेवटची इच्छा होती की त्याच्या अस्थी बनारस येथील गंगेत हिंदू विधींनुसार विसर्जित करण्यात याव्यात. हे वचन पूर्ण करण्यासाठी वॉ भारतात आला होता. तेव्हाचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

स्टीव्ह वॉ अनेक धर्मादाय संस्थांशी संबंधित आहेत आणि सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. माझ्या हातून पुण्यकर्म घडावं अशी इच्छा होती. ब्रायनच्या अस्थि गंगेत विसर्जित व्हाव्यात अशी त्याची इच्छा होती, ती मी पूर्ण केली. आता मला समाधान वाटलं, अशी प्रतिक्रिया स्टीव्ह वॉ याने त्यावेळी दिली होती.

टॅग्स :HinduहिंदूShane warneशेन वॉर्नSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल