शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या 'त्या' व्हिडीओची दखल; राज्य सरकार लवकरच राबवणार नवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 10:49 IST

काही मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

मुंबई – रविवारी दिवसभर सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओत काही तरुणांसोबत १८०० रुपयांवरुन घरकाम करणारी महिला भांडत असल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ गंमतीशीर आणि मनोरंजनासाठी शेअर केला होता. मात्र या व्हिडीओची गंभीर दखल राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने घेतली आहे.

याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्या काकूंची थट्टा उडवण्यात येत होती. या व्हिडीओत ती महिला घरकामाचे १८०० रुपये मागत होती, ज्या तरुणांशी ती भांडत होती त्यांनी १८०० रुपये दिल्याचं वारंवार सांगत होते.

मात्र काकू ऐकायला तयार नव्हत्या. यात तरुणांनी सांगितल्याप्रमाणे काकूंना ५०० च्या तीन नोटा, दोनशेची एक नोट आणि शंभराची एक नोट दिली असल्याचं सांगत होते. हे या काकूंनीही मान्य केले परंतु मला माझे १८०० रुपये हवेत असं त्यांचे म्हणणं होतं. या काकूंनी मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात मी खोटं बोलणार नाही, दीड हजार आणि तीनशे दिलेत असं सांगितलं मग १८०० रुपये कुठे आहेत असं काकू विचारत होत्या. यावर तरुण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण काकू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काही मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओचा वापर करुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आर्थिक साक्षरता, घसरलेल्या जीडीपीवरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील विरोधकांना लक्ष्य केले होते.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाYashomati Thakurयशोमती ठाकूर