Image Source: Brain Quiz
Spot The Difference : 'स्पॉट द डिफरन्स' पझल्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सॉल्व्ह करणं आवडतं. कारण यातून चांगला टाईमपास तर होतोच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. त्यामुळे हल्ली सोशल मीडियावर असे भरपूर फोटो लोक शेअर करतात. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला ३ फरक शोधायचे आहेत.
पहिल्या नजरेत हे चित्र खूप साधं वाटतं आणि तुम्हाला असंही वाटू शकतं की यात काहीच बदल नाहीत. मात्र, जर तुम्ही ते नीट आणि बारकाईने पाहिलंत तर या दृश्यात लपलेले ३ छोटे फरक तुम्हाला दिसून येतील. या फोटोत आपल्याला एक तरूणी लाल ड्रेस घालून डान्स करताना दिसत आहे. तिने एक फूल डोक्यात लावलं आहे आणि एक दातांमध्ये धरलं आहे. याच फोटोत आपल्याला ४० सेकंदात ३ फरक शोधायचे आहेत.
व्हिज्युअल कॉग्निशन विषयावर अनेक संशोधन झाले आहेत. या संशोधनानुसार, अशा लहान निरीक्षणावर आधारित क्रिया केल्याने एकाग्रता आणि नमुने ओळखण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. यामुळे मेंदू काही बाबींमध्ये प्रशिक्षित होतो. जसे की, लहान दृश्य बदल ओळखणे, अल्पकालीन स्मरणशक्ती सुधारणे, लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता वाढवणे आणि मानसिक सतर्कता वाढवणे. म्हणूनच अशा प्रकारचे पझल्स लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
अशा फोटोंमध्ये इतके सूक्ष्म बदल केलेले असतात की, ते सहजपणे शोधणं फारच अवघड काम असतं. आपल्याला ते शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते किंवा फोटो बारकाईने बघून शोधायचे असतात. तेव्हाच आपण यातील फरक शोधून शकतो. महत्वाची बाब म्हणजे करत असताना आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता वाढते. सोबतच आपली आयक्यू टेस्टही होते.
वरच्या फोटोत फरक सर्कल केलेले बघू शकता.
Web Summary : Spot the difference puzzles are viral, fun for all ages, and exercise the brain. This photo challenges you to find three differences in a dancing girl picture within 40 seconds, boosting concentration and pattern recognition.
Web Summary : अंतर ढूंढें पहेलियाँ वायरल हैं, सभी उम्र के लिए मजेदार हैं, और मस्तिष्क का व्यायाम कराती हैं। यह तस्वीर आपको 40 सेकंड में एक नृत्य करती लड़की की तस्वीर में तीन अंतर खोजने की चुनौती देती है, जिससे एकाग्रता और पैटर्न की पहचान बढ़ती है।