शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सॉरी, मी लोकांची माफी मागतो...; अखेर अशनीर ग्रोव्हर यांनी ट्विट केलेच! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:49 IST

शार्क टँक इंडिया शो मधून घराघरात पोहोचले अशनीर ग्रोव्हर

Ashneer Grover Indore Remark : भारतपेचे माजी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांचा एक व्हिडिओ सोमवारी समोर आला ज्यामध्ये ते इंदूरमधील लोकांशी संवाद साधताना दिसले. यावेळी त्यांनी इंदूरच्या जनतेने स्वच्छता सर्वेक्षणचा अहवाल पैसे देऊन विकत घेतल्याचे वादग्रस्त विधान केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी एकीकडे इंदूरच्या लोकांची माफी मागितली आहे तर दुसरीकडे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ‘नॉट सॉरी’ असं स्पष्टपणे म्हटले आहे.

इंदूरमधील एका कार्यक्रमात, जेव्हा अशनीरला भोपाळ विरुद्ध इंदूर या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी भोपाळचे वर्णन केले आणि सांगितले की, इंदूरच्या लोकांनी स्वच्छता सर्वेक्षण अहवाल खरेदी केला. स्वच्छ शहराबाबत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. मात्र, नंतर त्यांनी सांगितले की, येथे खूप बांधकाम सुरू आहे, तर भोपाळ हे यापेक्षा अनेक पटींनी चांगले आहे. पण, त्यांच्या या वादग्रस्त विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

इंदूरला 'सॉरी'; राजकारण्यांना 'नॉट-सॉरी'

आपल्या पोस्टमध्ये अशनीरने सर्वप्रथम इंदूरची माफी मागितली. तो म्हणाला की इंदूरमध्ये चांगले लोक आहेत आणि हे शहरही चांगले आहे. पण, राजकारणी अशांततेचे वातावरण करत नाही. भोपाळ विरुद्ध इंदूर या मुद्द्यावर खेळकर संभाषणात विनोदाने केलेल्या विधानावर विनाकारण राजकारण केले जात असल्याचे त्यांनी लिहिले आहे. तशा विधानाने कोणताही गुन्हा घडला नाही आणि प्रेक्षक आनंद घेत असल्याचे त्यांनी लिहिले. कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही. खोलीत बसलेले लोकही नाराज झाले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच लोकांना सॉरी पण राजकारण्यांना नॉट सॉरी असे त्यांनी लिहिले आहे.

येथून झाली वादाला सुरुवात

अशनीरचे हे वक्तव्य इंदूरच्या जनतेचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा अपमान असल्याचे सांगत शहराचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. अशनीरवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर भविष्यात अशा वक्त्यांना कार्यक्रमात आमंत्रित करणे टाळावे, अशा सूचनाही त्यांनी इंदूरच्या आयोजकांना दिल्या. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर अशनीरने हाच व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि सॉरी-नॉट सॉरी लेटर लिहिले.

टॅग्स :indore-pcइंदौरTwitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल