अमेरिकेतील २० वर्षीय सोफी रॅन सध्या चर्चेत आली आहे. सोफी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, आज ती इंटरनेटच्या 'जगात' धुमाकूळ घातलेय. कधीकाळी हॉटेलमध्ये भांडी घासणारी सोफी आज दरमहा ३.६ दशलक्ष डॉलर्स (म्हणजे सुमारे ३० कोटी रुपये) कमवत आहे. अतिशय गरिबीपासून अब्जाधीश झालेली सोपी नेमकं काय करते?
फ्लोरिडा येथील रहिवासी असलेल्या सोफीचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. सोफी म्हणते की, तिच्या कुटुंबाला अनेकदा उदरनिर्वाहासाठी फूड स्टॅम्पवर (अन्न भत्ता आणि अमेरिकेतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिली जाणारी आर्थिक मदत) अवलंबून राहावे लागत असे. तिच्या पालकांच्या आर्थिक अडचणी पाहून तिचे मन दुखावले. वयाच्या १७ व्या वर्षी तिने एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करायला सुरुवात केली, परंतु तिच्या सौंदर्याने आणि सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियतेने तिच्यासाठी एक नवीन मार्ग उघडला.
मित्रांच्या सल्ल्याने जेव्हा ती अडल्ट साइट ओन्लीफॅन्सवर आली अन् तिचे नशीब पालटले. त्यानंतर, सोफीच्या इंस्टाग्राम अकाउंटला ७ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स मिळाले. आता ती ओन्लीफॅन्सची नंबर वन स्टार आहे. रिपोर्ट्सनुसार, सोफीने फक्त एका वर्षात ४३ दशलक्ष डॉलर्स (म्हणजे सुमारे ३६० कोटी रुपये) कमावले आहेत. त्यानुसार, तिने दरमहा ३० कोटी रुपये कमावले.
साहजिकच अनेकांच्या दृष्टीने सोफीचे काम योग्य नाही. पण, ती म्हणते की, तिचा हेतू साफ आहे. ती आठवड्यातून सहा दिवस पुरुष चाहत्यांशी ऑनलाइन गप्पा मारते आणि सातव्या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रायश्चित करते. ती म्हणते की, जोपर्यंत देव काही 'इशारा' देत नाही, तोपर्यंत ती ही नोकरी सोडणार नाही. सध्या सोफी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काहीजण तिच्या धाडसाचे आणि तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक करत आहेत, तर अनेकांनी तिच्या व्यवसायाला धार्मिक आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे म्हटले आहे.