Son Father hugs after 24 Years, Viral Video: आईवडील आणि त्यांची मुलं हा प्रेमाचा ऋणानुबंध काही वेगळाच असतो. मुलं कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांसाठी ती लहानच असतात. त्यांनी आपल्या मुलांची नेहमी काळजी असते. मुलं घरापासून दूर असली तरीही फोनच्या किंवा इतर माध्यमातून आईवडील मुलांच्या संपर्कात असतात. पण एखाद्या मुलाला आपले वडील तब्बल २४ वर्षांनी भेटत असतील तर त्या बाप-लेकाची अवस्था काय होत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. एका बाप-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी या व्हिडीओतून दिसत आहे.
असे सांगितले जात आहे की, मुलगा गेल्या २४ वर्षांपासून केवळ एका फोटोच्या मदतीने त्याच्या वडिलांचा शोध घेत होता. शेवटी, जेव्हा वडील आणि मुलगा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघांनाही आनंद आणि भावना अनावर झाल्या. त्यांनी कडकडून मिठी मारली आणि दोघेही कमालीचे भावनिक झाल्याचे दिसून आले. हा प्रसंग पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले. पाहा व्हिडीओ-
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगा खूप दिवसांनी वडिलांना पाहून खूप रडू लागतो. सुरुवातीला त्या माणसाला (वडीलांना) नीटसे काही कळत नाही. पण नंतर तो त्याच्या कुटुंबाबद्दल आणि स्वतःबद्दल सांगताच वडीलांना सारं काही स्पष्ट होतं आणि ते भावनिक झाला. यानंतर दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ते दृश्य खरोखरच भावनिक दिसते. काही लोक या घटनेने भावनिक झालेत. पण काहींच्या मते हा प्रसंग खराखुरा नसून मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला स्क्रिप्टेड व्हिडीओ असण्याचीही शक्यता आहे.