Social Media Viral Video: आजकाल सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक काहीही करत आहेत. मागील काही वर्षांपासून रील बनवणे सामान्य बाब झाली आहे. मात्र, या माद्यमातून लोकप्रिय होण्यासाठी अनेकजण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक नवीन व्हायरल व्हिडिओ चर्चेत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?
व्हिडिओमध्ये दिसते की, 20-25 वर्षांचे काही तरुण एक पुलावर उभे आहेत अन् एक तरुण पुलाखाली पायाला कपडा बांधून लटकलाय. पुलावर उभे तीन तरुणांनी त्या कपड्याला धरले आहे. तर, नदीमध्ये एक मुलगी पाण्यात बुडत असून, तो तरुण त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्यांच्या वाचवण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट होते की, हे सर्व रील बनवण्यासाठी केले जात आहे.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @ChapraZila या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला. पोस्ट करताना लिहिले, "व्हिडिओ बनवण्यासाठी आजचे तरुण कोणत्याही थराला जात आहेत." बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 48 हजार हून अधिक लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओवर एका यूजरने प्रतिक्रिया दिली, "हा मूर्खपणा आहे." दुसऱ्या यूजरने लिहिले, "व्हिडिओ बनवू नकोस, काम-धंदा कर, पैसे कमव." अशाप्रकारच्या विविध प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.