शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Viral Video: खुर्चीवर आरामात काम करत बसला होता, अचानक पायावर लटकला भयंकर विषारी साप; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:53 IST

प्रत्येक साप विषारी नसला तरी सापाला पाहूनच थरकाप उडतो. सध्या अशीच स्थिती ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीची झाली. या व्यक्तीला कल्पनाही नव्हती ती साप अगदी त्याच्या जवळ पोहोचला आहे (Snake Crawls Near Man).

साप टीव्हीमध्ये किंवा प्राणिसंग्रहालयात दिसला तरीही अनेकांना घाम फुटतो. अशात साप थेट समोर आल्यावर तर काय अवस्था होईल, याची कल्पनाही घाबरून सोडणारी आहे. प्रत्येक साप विषारी नसला तरी सापाला पाहूनच थरकाप उडतो. सध्या अशीच स्थिती ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीची झाली. या व्यक्तीला कल्पनाही नव्हती ती साप अगदी त्याच्या जवळ पोहोचला आहे (Snake Crawls Near Man).

काही घटना इतक्या अजब असतात की त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या नाहीत तर त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Snake Video Viral) चांगलाच चर्चेत आहे. न्यूज चॅनल एबीसी न्यूजने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्ट्रेलियातील एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो भीतीदायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जिप्सलँड येथील आहे. व्हिडिओमध्ये मालकम नावाचा एक व्यक्ती बाहेरच टेबल आणि खुर्ची घेऊन बसलेला दिसतो. तो आरामात आपलं काम करत असतो.

इतक्यात या व्यक्तीला आपल्या पायाजवळ साप आल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये दिसतं की साप अतिशय मोठा आहे आणि तो सरपटत मालकमच्या खुर्चीकडे येऊ लागतो. हा व्यक्ती आपल्या कामाता व्यस्त आहे, त्यामुळे त्याला जराही चाहूल लागत नाही की साप त्याच्या किती जवळ आला आहे. अचानक साप मालकमच्या रोटेटिंग चेयरजवळ पोहोतचो आणि काही वेळात या व्यक्तीच्या पायावर चढू लागतो. यानंतर मालकमला जाणवतं की त्याच्या पायाजवळ काहीतरी आहे. हे पाहून तो पाय झटकतो. यानंतर साप लगेचच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतो. मालकमही लगेचच घाबरून खुर्चीवरुन उठतो आणि सापाकडे बघत राहातो.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी हैराण करणारी आहे. व्यक्तीने सर्वात आधी हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट रेडिटवर पोस्ट केला आणि सांगितलं की घटना जवळपास दोन आठवड्यांपूर्वीची आहे. जेव्हा साप त्याच्या घरात शिरला होता. मालकलने सांगितलं की त्याला वाटतं हा टायगर स्नेक होता. टायगर स्नेक अतिशय विषारी असतात आणि त्यांनी चावा घेतल्यास माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया