शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Video: रस्त्यात बाईक आडवी टाकली, मुलीला खाली पाडलं, गळ्यातली चेन चोरली अन् मग आला 'ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:02 IST

Shocking Viral Video: महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून पळणाऱ्या चोराचा फिल्मी स्टाईल व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: आजकाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, सामान्य नागरिकांनी दाखवलेले धाडस गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून पळणाऱ्या सोनसाखळी चोराला फिल्मी स्टाईल पकडले.

नेमकी घटना काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेला भुरटा सोनसाखळी चोर तिच्या गळ्यातील साखळी ओढण्याचा प्रयत्न करतो. या झटापटीत दोघेही जमिनीवर पडतात. चोर सोनसाखळी हिसकावून पुन्हा दुचाकीवर बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. पण तितक्यात महिला जोरजोरात आरडाओरडा करते. महिलेचा आवाज ऐकून जवळच्या घरातील एक तरुण-तरुणी बाहेर आले. चोराची दुचाकी सुरू होऊन ती वेगात पुढे जाण्यापूर्वीच घरातून आलेल्या तरुणाने चोराच्या दिशेने धाव घेतली आणि धावत जाऊन त्याला गाठले व पकडून ठेवले. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने चोराला पकडून ठेवल्यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा २२ सेकंदांचा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @mktyaggi या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकरी या तरुणाच्या हिमतीचे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, अशा धाडसी नागरिकांमुळेच समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पण हा व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, चोराला पकडणाऱ्या या 'रिअल लाईफ हिरो'ची सर्वत्र चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chain Snatcher Caught After Brave Citizen's Intervention Saves Woman.

Web Summary : A woman was attacked by a chain snatcher, but a quick-thinking young man intervened, catching the thief and handing him over to the police with the help of others. The brave act is praised online.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाChain Snatchingसोनसाखळी चोरी