शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

धक्कादायक! रेल्वे ब्रिजवर सल्फी घेत होतं कपल, अचानक मागून आली रेल्वे आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:19 IST

Railway Bridge Accident: स्टंटबाजीच्या नादात अनेकांना आपला जिवही गमवावा लागतो. तर कधी कपल्स गंभीर जखमी होतात. एका कपलसोबत असंच झालं.

Goram Ghat Railway Bridge Accident: सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करत आहेत. तसेच सध्या वेगवेगळ्या लोकेशनवर लग्नाआधी फोटोशूट करण्याची क्रेझही खूप वाढली आहे. अशात फोटोशूट करताना घडलेल्या अनेक धक्कादायक घटनाही समोर येत असतात.

सध्या अशीच एक थरकाप उडवणारी घटना चर्चेचा विषय ठरत आहे. स्टंटबाजीच्या नादात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. तर कधी कपल्स गंभीर जखमी होतात. एका कपलसोबत असंच झालं. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की, त्यांच्यासोबत असं काही होईल. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे.

धडकी भरवणारा व्हिडीओ

सध्या हा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक कपल रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ बनवताना दिसत आहे. पण तेव्हाच असं काही घडतं की, त्यांचा आनंद दु:खात रूपांतर होतो. एक कपल रेल्वे रूळावर सेल्फी घेत होतं. तेव्हाच एका बाजूने रेल्वे येते. पण त्यांना पळून जाण्यासाठी कुठेच जागा नसल्याने कपल जीव वाचवण्यासाठी रेल्वेच्या पुलावरून खाली खोल दरीत उडी मारतं. असं समजलं की, दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

लवे ब्रिजवर रील बनवत होतं कपल अन् आली रेल्वे

व्हायरल झालेला हा व्हिडीओ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हटल्या जाणाऱ्या गोरमघाटचा आहे. या घटनेत जखमी पती राहुल याला स्थिती गंभीर असल्याने सोजतहून जोधपुरला रेफर करण्यात आलं आहे. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, बागड़ीच्या कलाल पिपलिया येथे राहणारा राहुल पत्नी जानवी, साडू आणि मेव्हणीसोबत गोरमघाटला फिरायला गेला होता. या दरम्यान दोघेही गोरमघाट रेल्वे ब्रिजवर सेल्फी घेत होते. तर त्याचा साडू आणि मेव्हणी पुढे गेले होते. अचानक तेव्हाच एक भरधाव रेल्वे आली आणि घाबरल्यामुळे राहुल व जान्हवीने रेल्वे ब्रिजवरून दरीत उडी मारली. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे आणि लोकांचा बेजबाबदारपणा कसा त्यांच्या अंगलट येतो हेही यातून दिसलं आहे.

(VIDEO Credit : Teztv 24 bengal)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघातRajasthanराजस्थान