Sara Tendulkar Shubman Gill Viral Video : भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) सध्या क्रिकेटव्यतिरिक्त आणखी एका विषयामुळे चर्चेत आहे. सध्या शुबमन गिल इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. याचदरम्यान, लंडनमनध्ये तिसऱ्या कसोटीच्या आधी शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे समोरासमोर आले. काही काळापूर्वी शुबमन आणि सारा दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर काही कारणास्तव या चर्चा थंडावल्या. पण एकाच कार्यक्रमासाठी सारा आणि गिल दोघांनीही हजेरी लावल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आले. कार्यक्रमातील काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. तशातच आता त्या दोघांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नव्या व्हिडीओत काय?
सारा आणि शुबमन हे दोघेही यू व्ही कॅन या एका चॅरिटी डिनर कार्यक्रमात समोरासमोर आले होते. युवराज सिंगच्या फाउंडेशनचा हा कार्यक्रम होता. त्यात सारा सहकुटुंब हजर होती. तर शुबमन टीम इंडियासह पोहोचला होता. सारा जिथे बसली होती, तेथून गिल पास झाला तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिल्याचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसेच, एका व्हिडीओमध्ये रविंद्र जाडेजा शुबमन गिलला चिडवत असल्याचेही दिसले होते. पण आताच्या नव्या व्हिडीओमध्ये मात्र वेगळीच मजा पाहायला मिळतेय. शुबमन गिल एका मुलीशी गप्पा मारताना दिसतोय. साराची नजर शुबमनला शोधते आणि अखेर ती शुबमनला मागे वळून पाहते असा दावा करणारा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यातील जवळीक आणि त्यांना एकत्र पाहण्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरशी अनेक वेळा जोडले गेले आहे. दोघेही यापूर्वी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत होते. पण काही महिन्यांपूर्वी शुभमन गिलने एका मुलाखतीत तो तीन वर्षांपासून सिंगल असल्याचे उघड करून अफवांना पूर्णविराम दिला.