शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'बसपन का प्यार' गाण्यानं सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या चिमुकल्या मुलाला मिळालं मोठं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:19 IST

''बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...'' हे गाणं काही बॉलिवूड गाणं नसून सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्या मुलानं गायलं आहे.

सोशल मीडियावर नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल व रातोरात कोण स्टार होईल याचा काही नेम नाही. तशी अनेक उदाहरणं देखील आजवर घडली आहे. यातच एक नवं आणि ताजं उदाहरण म्हणजे 'बसपन का प्यार' हे गाणं सध्या सोशल मीडियात तुफान हिट झाला आहे. ''बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...'' हे गाणं काही बॉलिवूड गाणं नसून सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्या मुलानं गायलं आहे. सोशल मीडियात हे गाणं व्हायरल झाल्यानंतर सहदेव रातोरात स्टार झालं आहे. यातच आता एमजी मोटर्सच्या शोरुमच्या मालकानं सहदेवच्या गाण्यावर खूश होऊन त्याला २१ हजारांचा धनादेश देऊ केला आहे.  

'बसपन का प्यार' गाण्यानं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून या गाण्यावर अनेक व्हिडिओ आणि मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजनंही या गाण्यावर काही व्हिडिओ आणि रिल्स तयार केले आहेत. रॅपर आणि गायक बादशाह यानंही सहदेवसोबत 'बसपन का प्यार' हे गाणं रिलिज करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचं चित्रीकरण देखील नुकतंच पूर्ण झालं आहे. ११ ऑगस्ट रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. 

गायक बादशाह यानं सहदेवला व्हिडिओ कॉल करुन त्याच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर त्याला चंदीगढला बोलवून घेतलं होतं. बॉलिवूड तर सहदेवच्या गाण्याच्या प्रेमात पडलं आहेच. पण मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील या गाण्याचे चाहते झाले आहेत. नुकतंच मुख्यमंत्री बघेल यांनी सहदेवला बोलावून घेतलं होतं आणि त्याचं गाणं ऐकलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील भूपेश बघेल यांनी शेअर केला होता. 

सहदेव एका छोट्याशा गावात राहात असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरात मोबाइल, टीव्ही व इतर कोणत्याच सुखसोयी नाहीत. दुसऱ्याच्या मोबाइलवर गाणं ऐकून त्यानं हे गाणं शाळेत गायलं होतं. आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी फक्त एका क्षणाची गरज असते आणि सहदेवच्या बाबतीतही तेच झालं आहे. सहदेवला मोठं होऊन एक उत्तम गायक व्हायचं आहे असं तो सांगतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके