Sachin Tendulkar mother viral video: क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित करणारा 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही तितकाच आदर्श मुलगा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नुकताच सचिन तेंडुलकरच्या आईचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो पाहून क्रिकेट चाहत्यांचे डोळे पाणावले. नातू अर्जुन तेंडुलकर आणि नातसून सानिया चांडोक यांच्या लग्नासाठी सचिनची आई आली होती. आपल्या वयोवृद्ध आईला प्रवासात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सचिनने आपल्या कारमध्ये केलेले खास तांत्रिक बदल या व्हिडिओतून समोर आले.
व्हिडिओमध्ये खास काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकर या व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत आहेत. वयोमानानुसार त्यांना चालणे किंवा कारमध्ये चढणे कठीण होत असावे, हे ओळखून सचिनने आपल्या कारच्या मागील भागात एक खास 'हायड्रोलिक लिफ्ट' किंवा 'रॅम्प' यंत्रणा बसवून घेतली आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका उपकरणाच्या साहाय्याने आईची व्हीलचेअर थेट जमिनीवरून उचलली जाते आणि सुरक्षितपणे कारच्या आत नेली जाते. यावेळी काही नातेवाईक स्वतः उभा राहून सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत आहेत. आपल्या आईला कारमध्ये बसवण्यासाठी कोणाचीही ओढाताण होऊ नये आणि आईलाही कोणताही शारीरिक त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी सचिनने घेतल्याचे यातून स्पष्ट दिसते आहे.
--
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या व्हिडिओवर 'Now he carries his mother's care' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच चाहत्यांनी सचिनच्या संवेदनशीलतेचे प्रचंड कौतुक केले आहे. अनेक युजर्सनी म्हटले आहे की, "सचिनने केवळ मैदानातच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही आईची सेवा कशी करावी, याचा नवा आदर्श घालून दिला आहे." क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सचिन आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवताना दिसतो. आईच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर सणांना तो नेहमीच आईसोबतचे फोटो शेअर करत असतो. मात्र, या व्हिडिओने त्यांच्यातील घट्ट नात्याचे आणि काळजीचे एक वेगळेच दर्शन घडवले आहे.
Web Summary : Sachin Tendulkar arranged a car with a hydraulic lift for his mother, Rajni Tendulkar, who uses a wheelchair. This ensured her comfort during travel to her grandson's wedding, showcasing his care and devotion.
Web Summary : सचिन तेंदुलकर ने अपनी माँ, रजनी तेंदुलकर, जो व्हीलचेयर का उपयोग करती हैं, के लिए हाइड्रोलिक लिफ्ट वाली कार की व्यवस्था की। इससे उनके पोते की शादी में यात्रा के दौरान उन्हें आराम मिला, जो उनकी देखभाल और भक्ति को दर्शाता है।