शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Millionaire Kids : डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 13:35 IST

Millionaire Kids : हा मुलगा सध्या वर्षाला सूमारे 150 कोटी रुपये कमावतो.

Millionaire Kids : आज आम्ही तुमची ओळख अशा मुलाशी करुन देणार आहोत, ज्याने अवघ्या लहान वयातच कोट्यवधी रुपये कमावले आहेत. रायन काझी असे त्या मुलाचे नाव असून, वयाच्या 9 व्या वर्षी रायनने 800 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, रायन नेमकं काय काम करतो, ज्यामुळे त्याने इतके कोटी कमावले आहेत. 

अशी झाली सुरुवात...रायनचा जन्म अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरात झाला. रायनला लहानपणापासूनच खेळण्यांची खूप आवड होती आणि त्याच्या आई-वडिलांनी तो अवघ्या 3 वर्षांचा असताना त्याच्या नावाने YouTube चॅनेल Ryans World (ryans.world) सुरू केले. तो घरात खेळायचा आणि त्याचे आई-वडील त्याचे व्हिडिओ बनवून YouTube वर टाकायचे. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आणि आता तो यूट्यूबच्या जगात सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी बनला आहे. फोर्ब्सने रायनचा वयाच्या 7 व्या वर्षीच जास्त कमाई करणाऱ्या युट्युबर्सच्या यादीत समावेश केला होता.

वार्षिक 150 कोटी कमाईरायनचे व्हिडिओ पाहणारे दर्शक 3 ते 6 वयोगटातील लहान मुलं आहेत. सध्या, YouTube Ryan's World वर त्याचे 3.39 कोटी पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर आतापर्यंत या चॅनेलवर 53.2 अब्ज व्ह्यूज आले आहेत. या स्वप्नवत यशासाठी रायनला फेव्हरेट मेल सोशल स्टारच्या किड्स चॉईस अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले आहे. 2018 मध्ये रायनची कमाई सुमारे 142 कोटी रुपये होती. सध्या त्याच्या कमाईचा आकडा आता वार्षिक 150 कोटींच्या पुढे गेला आहे. फोर्ब्सनुसार, रायन 9 वर्षांचा होता तोपर्यंत त्याची उलाढाल 800 कोटींहून अधिक होती.

1600 उत्पादनांना रायनचे नावरायनची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, आज जगभरातील 30 देशांमध्ये त्याचे नाव वापरले जाते. रायनच्या नावाने जगभरात 1,600 उत्पादने विकली जातात. यामध्ये स्केचर्स, पायजामा, रोब्लॉक्स, बेडिंग, घड्याळे, खेळाच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, फर्निचर, टूथपेस्ट आणि खेळणी यांचा समावेश आहे.

मुलाच्या नावावर कंपनीरायनच्या कुटुंबाने सनलाईट एंटरटेनमेंट नावाची निर्मिती कंपनीही उघडली आहे. ही कंपनी कौटुंबिक कंटेट तयार करते, जी मुलांना शिकण्यास आणि वाढण्यास मदत करते. सध्या ही कंपनी 8 YouTube चॅनेलचे व्यवस्थापन करत आहे. कंपनीमध्ये व्हिडिओग्राफर, संपादक, अॅनिमेटर, लेखक आणि व्हॉइस-ओव्हर कलाकारांसह एकूण 30 कर्मचारी आहेत. या YouTube चॅनेलद्वारे दर आठवड्याला 25 व्हिडिओ रिलीज केले जातात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया