शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खरंच तिसरं महायुद्ध होणार? मॅथच्या 'या' फॉर्म्यूल्यातून मिळतायत धक्कादायक संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 22:24 IST

या तारखांची संख्या जोडल्यास 68 होते. हा फॉर्म्यूला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर अनेकांनी यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जगात तणावाचे वातावरण आहे. ही तिसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात तर नाही ना? अशी चर्चाही जगभरात होताना दिसत आहे. यातच एका व्यक्तीला पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या तारखेत, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या तारखेत आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या तारखेत विलक्षण साम्य आढळून आले. या तारखांची संख्या जोडल्यास 68 होते. हा फॉर्म्यूला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर अनेकांनी यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. 

याव्यक्तीनं जोडला महायुद्धांशी संबंध - पॅट्रिक बेट-डेव्हिड (Patrick Bet-David) यांनी 28 जुलै 1914 ही तारीख बघितली. या तारखेला ऑस्ट्रिया-हंगेरीने पहिल्या महायुद्धाला सुरुवात करत सर्बियाविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. पॅट्रिकने 7, 28, 19, 14 या आकड्यांची बेरीज केली आणि उत्तरात 68 हा आकडा आला. यानंतर त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीची तारीख 1 सप्टेंबर, 1939 घेतली. या तारखेच्या आकड्याचीही बेरीज 68 आली.

पुतिन यांनी या तारखेला केली होती युद्धाची घोषणा - यानंतर पॅट्रिकने ज्या दिवशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली, ती तारीख म्हणजेच 24 फेब्रुवारी 2022 घेतली आणि हिचीही बेरीज (24+2+20+22 = 68) 68 एवढीच आली. पॅट्रिकने या तारखांतील संबंध शेअर करत ट्विट केले, 'माझ्यासाठी गणितीय सूत्र सर्वकाही आहे. हे अजब आहे.' हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटला बातमी लिहेपर्यंत 12,000 हून अधिक लोकांनी लाईक केले होते. तर 3,500 हून अधिक लोकांनी रीट्वीट केले होते.

अशा आल्या युजर्सच्या प्रतिक्रिया -पॅट्रिक यांच्या या फॉर्म्यूल्यावर एका युजरने म्हटले आहे, "हे फारच विचित्र आहे." आणखी एकाने लिहिले, "हे स्वीकार करावेच लागेल, पण हे थोडे विचित्र आहे." अशा अनेक प्रतिक्रिया या संबंधित पोस्टवर आल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाTwitterट्विटर