शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:39 IST

रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

मुंबई - टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुकवर पोस्टवर टाटानं लिहिलं आहे की, लॉन्स एंजिल्समध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरु केली. १९६२ चा तो काळ खूप सुंदर होता. लॉन्स एंजिल्समध्ये माझं एकीवर प्रेम होतं. तिच्यासोबत लग्न जवळपास निश्चित झालं होतं. मात्र माझ्या आजीची तब्येत बिघडल्यानंतर मला भारतात परतावं लागलं असं ते म्हणाले. 

मी जेव्हा भारतात आलो त्यावेळी माझं जिच्यावर प्रेम होतं तीदेखील माझ्यासोबत यावं असा विचार होता. पण भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला आणि तिथेच आमच्या दोघाचं नातं संपुष्टात आलं. 

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजीने केले संस्कार रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आजी नवजबाई टाटा यांनी त्यांचा सांभाळ केला. रतन टाटांनी सांगितले की, आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आणि माझ्या भावाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही आमचं बालपण नेहमी आनंदात गेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आजीने आम्हा दोघा भावंडांना सुट्टीमध्ये लंडनला घेऊन गेली. त्याचठिकाणी आम्ही खऱ्याअर्थाने जीवनात अनेक मूल्य शिकलो. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असते असं आजीने आम्हाला समजावलं. 

वडिलांचे विचार जुळत नव्हतेमला वायलिन शिकण्याची खूप इच्छा होती पण वडील पियानो शिकवण्यावर भर देत होते. मला कॉलेजचं शिक्षण अमेरिकेत घ्यायचं होतं पण वडिलांनी यूकेला पाठवलं. मला आर्किटेक्ट बनण्याची इच्छा होती पण वडील सांगायचे इंजिनिअर हो. आजी नसती तर मी अमेरिकेत शिक्षण घेऊ शकलो नसतो. आजीमुळे मी मॅकेनिकल इंजिनिअरींगमधून बाहेर पडत आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला. वडील माझ्यावर नाराज झाले पण माझी इच्छा पूर्ण झाल्याने मी आनंदी होतो. आपलं म्हणणं मांडण्याची हिंमत करतानाही त्यात विनम्रता आणि सभ्यता असायला हवी हीदेखील शिकवण आजीने दिली आहे. 

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाIndiaभारतchinaचीनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट