जयपूर : तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर आधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. यामध्ये एक इलेक्ट्रिक कार चक्क बैलगाडीला बांधून ओढताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ राजस्थानच्या कुचमन शहरातील आहे. कुचमन नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची इलेक्ट्रिक कार अचानक बंद पडली, यानंतर त्यांना बैलगाडीला बांधून कार गॅरेजपर्यंत न्यावी लागली.
आलिशान इलेक्ट्रीक कार चक्क बैलगाडीने ओढून नेताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कुचमन नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल सिंह मेडातीया यांची ही इलेक्ट्रिक कार होती. कुचामणपासून दूर असलेल्या ग्रामीण भागात कारचे ब्रेक फेल झाल्यानंतर बैलगाडी मागविण्यात आली. बैलगाडीला बांधून गाडी ओढून कुचामण शहरात आणण्यात आली. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कार घेऊ फक्त 1 वर्ष झालेया घटनेबाबत विरोधी पक्षनेते अनिल सिंह मेडातीया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे. त्यांनी ही कार गेल्यावर्षी खरेदी केली होती. म्हणजे, फक्त एका वर्षात कार भररस्त्यात खराब झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.