शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

राजस्थानमध्ये बर्निंग कारचा थरार! धावत्या कारमधून निघू लागला धूर, काहीच क्षणात गाडीने घेतला पेट अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:03 IST

राजस्थानमध्ये धावत्या कारची दुभाजकाला धडक, परिसरात एकच खळबळ. 

Rajasthan Car Accident Video: राजस्थानातील अजमेरमध्ये एका भरधाव कारची दुभाजला धडक लागून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला.  ज्यामध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

अजमेरमध्ये शनिवारी रात्री अकराच्या सुमारास या भरधाव कारचा अपघात झाला. सदर घटनेविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाताना ही कार अचानक दुभाजकाला धडकली. त्यादरम्यान या कारने पेट घेतला. गाडीला आग लागताच तेथे उपस्थित स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न करता गाडीच्या काचा फोडल्या. पेटत्या कारमधून त्यांनी तरुणांना बाहेर काढले. 

या कारमध्ये एकूण पाच जण होते. त्यातील दोघांचा या दूर्घटनेतच मृत्यू झाला. तर त्यातील एकाने रुग्णालयात दाखल करण्याआधीच वाटेत प्राण सोडला. सध्या या अपघातात बचावलेल्या दोघांवर जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कबीर सिंग आणि जय सांखला आणि सोहेल खान अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, या कारला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRajasthanराजस्थानAccidentअपघात