शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला विचारुन पॉलिसी काढली का"; वर्षाला ५० हजार प्रीमियम भरूनही आईचा क्लेम नाकारला; मुलाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:09 IST

क्लेम नाकारण्याच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट

Social Viral: दरवर्षी वेळेवर प्रीमियम भरूनही ऐन गरजेच्या वेळी विमा कंपनीने हात वर केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या आरोग्यासाठी दरवर्षी ५० हजार रुपये मोजणाऱ्या एका मुलाला, आई आजारी पडल्यानंतर विमा कंपनीच्या कार्यालयातून रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आरोग्य विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकी घटना काय?

संबंधित तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. त्याने आरोप केला की, "विमा कार्यालयात तासनतास वाट पाहायला लावून अखेर माझा क्लेम नाकारण्यात आला. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तेथील एका एजंटने त्याला, आम्हाला विचारून पॉलिसी घेतली होती? असा प्रश्न विचारला. यामुळे विमा कंपन्या ग्राहकांप्रती किती असंवेदनशील आहेत, हे समोर आले आहे.

प्रीमियमसाठी वसुली, क्लेमसाठी नकार

या पोस्टनंतर सोशल मीडियावर ग्राहकांनी विमा कंपन्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी आरोप केला की, कंपन्यांचे लक्ष फक्त प्रीमियम गोळा करण्यावर असते, पण क्लेम देण्याची वेळ येते तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जातात. एका युजरने म्हटले, "मी ८ वर्षांपासून ८० हजार रुपये प्रीमियम भरतोय, पण मला आता भीती वाटतेय की माझ्या बाबतीतही असंच घडेल का?"वाढत्या तक्रारी पाहता या क्षेत्रात कडक नियमावली आणि सरकारी हस्तक्षेपाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कंपनीचे स्पष्टीकरण

या वादानंतर हेल्थ इन्शुरन्सने सार्वजनिकरीत्या आपली बाजू मांडली आहे. क्लेमचे निर्णय हे पॉलिसी कागदपत्रे आणि वैद्यकीय नोंदींच्या आधारे घेतले जातात. जर पॉलिसी घेताना जुन्या आजारांची माहिती दडवली असेल, तर नियमांनुसार क्लेम नाकारला जाऊ शकतो, असं कंपनीने सांगितले. तक्रार निवारणासाठी आमच्याकडे स्वतंत्र प्रक्रिया असल्याचेही कंपनीने नमूद केले. मात्र, एजंटच्या उद्धट वागणुकीवर कंपनीने कोणतेही भाष्य केलेले नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Insurance claim denied despite premium; son questions policy terms.

Web Summary : A son expresses outrage after his mother's health insurance claim was denied, despite paying a yearly premium. The insurance company cited policy discrepancies, sparking debate on customer service and transparency. Concerns rise about claim denials and need for strict regulations.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHealthआरोग्य