शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 12:44 IST

राजस्थानचा पंजाबवर शेवटच्या षटकात विजय

Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात सहज विजय मिळवला. जॉनी बेअरस्टोचे दमदार अर्धशतक (५६) आणि जितेश शर्माची शानदार फटकेबाजी (३८*) यांच्या बळावर पंजाबने २० षटकांत राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जैस्वालने सुरेख अर्धशतक झळकावत विजयाचा पाया घातला. तर शिमरॉन हेटमायरने (३१*) लौकिकाला साजेशी फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटा ही अनेकदा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहली आहे. पण शनिवारच्या सामन्यात प्रिती झिंटाचा पती जीन गुडनॉफदेखील तिच्यासोबत सामन्यासाठी उपस्थित राहिला होता. पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या जोडप्याने खेळाचा आनंद लुटला आणि संघाला चीअर करत जल्लोष केला. जेव्हा लियम लिव्हिंगस्टोनने त्याच्या डावातील पहिला षटकार मारला, तेव्हा तर प्रीती झिंटा आणि तिचा नवरा जीन गुडनॉफ आनंदाने उड्या मारून जल्लोष करताना दिसले. पाहा Video-

प्रीती झिंटा आणि जीन गुडनॉफ हे काही दिवसांपूर्वीच आई-बाबा झाले. प्रितीच्या घरी गोंडस जुळ्या मुलांचा जन्म झाला. प्रीती आणि जीन यांचा विवाह २०१६ साली झाला होता. जीन गुडनॉफ हा एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. या मोसमाच्या सुरुवातीला प्रिती झिंटा आपल्या संघाला चीअर करण्यासाठी पोहोचू शकली नाही. पण गेल्या दोन-तीन सामन्यांपासून ती सतत आपल्या संघाला चिअर करण्यासाठी पोहोचत आहे. तशातच शनिवारी तिच्यासोबत तिच्या नवऱ्यानेही हजेरी लावली. परंतु, प्रितीच्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Preity Zintaप्रीती झिंटाpunjab kingsपंजाब किंग्सRajasthan Royalsराजस्थान रॉयल्स