शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! ९ महिन्यांच्या गर्भवतीने ५ मिनिटांत पार केलं 'इतकं' अंतर, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 19:35 IST

Viral Video : हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच  राहिले आहेत.  मायकेल मायेर या युजरने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्त्री सहनशीलता आणि कर्तृत्व यांच्या जोरावर जगातील कोणतंही अशक्य असं काम ती करू शकते.  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा व्हिडींओच्या माध्यमातून कोणी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला पाहायला मिळतो. असामान्य कार्याचे, कामगिरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच जास्त पाहिले जातात. सध्या एका गर्भवती महिलेचा व्हिडीओ व्हायरल  होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच  राहिले आहेत.  मायकेल मायेर या युजरने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Michael Mayer यांनी आपली पत्नी Makenna सोबत पळण्याची शर्यत लावली होती. त्यांच्यामते नवव्या महिन्यात ८ मिनिटात एक मैल अंतर महिला पार करू शकते. पण मेकान्नानं ५ मिनिट २५ सेकंदात ही शर्यंत पूर्ण केली आहे. या महिलेच्या जिद्दीमुळे तिने तिच्या पतीलाही हरवलं आहे.  पत्नीने हरवल्यामुळे मायकेल खूप खूष आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.  एका युजरने कमेंट केली आहे की, मी गर्भवती नसतानाही इतकं धावू शकत नाही. धावण्याची शर्यंत जिंकलेल्या महिलेला आयरन लेडी असं म्हटलं आहे. या आधीही गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर परिक्षा  दिल्याची घटना समोर आली होती. 

अमेरिकेतील इलियॉन येथिल रहिवासी असलेली ब्रायना हिल ही महिला परीक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोहोचली. परिक्षा सुरू होण्याच्या आधीच एक अनपेक्षित प्रकार घडला.  ब्रायना ही शिकागो लॉ स्कूलमधून वकीलीची परीक्षा देत होती. परिक्षा हॉलमध्ये शिरताच तिला प्रसृतीकळा सुरू झाल्या. सीएनएननं दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रायनाला पेपर सुरू होण्याच्या ३० मिनिटंआधीच या वेदना सुरू झाल्या होत्या. वेदना होत असतानाच ब्रायना पेपर सोडवायला बसली. काहीवेळानंतर वेदना असहय्य झाल्याने  तिने नवऱ्याला बोलावून घेतले.  काय सांगता?... 'या' गावात फक्त दोघचं राहतात, तरीही घेतलीय कोरोनाची धास्ती!

संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ब्रायनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री १० वाजता ब्रायनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा पेपर होता, अखेर विद्यापीठाची परवानगी घेतली त्यानंतर ब्रायनाने रुग्णालयात दुसरा पेपर दिला. यानंतर प्रशासनाचे आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानले. बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके