शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळत्या कारमधुन कुत्र्याला काढलं सुखरुप बाहेर, पोलिसांच्या शौर्याचं होतंय कौतुक, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:20 IST

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे.

अनेक प्राणीप्र्मी असे आहेत जे आपल्या पेट्सना जीव की प्राण मानतात. त्यांच्यावर मुलासारखं प्रेम करतात. सोशल मीडिया(Social Media)वर देखील असे  व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे.

ही घटना २२ जानेवारीला अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये घडली होती, मात्र आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस कर्मचारी कुत्र्याचा जीव वाचवत असताना ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्स या पोलिसाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. प्रत्येकजण त्याला खरा हिरो म्हणत आहेत.

व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एका कारला आग लागल्याचे दिसत आहे. त्याचवेळी त्याच्याभोवती काही लोक उभे असतात. गाडीच्या आत कोणीतरी अडकल्यासारखे दिसते. मग डग्लस काउंटीचे पोलीस अधिकारी मायकेल ग्रेगोरेक यांनी त्या माणसाकडे पाहिले, जो ओरडत होता की त्याचा कुत्रा जळत्या वाहनाच्या आत अडकला होता. हा सगळा प्रकार पोलीस अधिकारी मायकेल यांना समजताच कोणताही उशीर न करता ते कारमधून बाहेर पडतात आणि जळत्या एसयूव्हीकडे धावतात. त्यानंतर ते कुत्र्याचा शोध घेऊ लागतात. मग कसे तरी ते कुत्र्याला बाहेर काढतात.

कुत्र्याचा मालक किती घाबरलेला आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो आपल्या कुत्र्याला सुरक्षित पाहण्यासाठी उत्सुक आहे. त्याचवेळी पोलीस अधिकारी मायकेल ग्रेगोरेक कारच्या मागील भागातून कुत्र्याला बाहेर काढतात. यादरम्यान कुत्राही खूप घाबरलेला दिसतो. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आणि तो जिवंत जळण्यापासून बचावला. याआधी वाहन मालकाने आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला होता, त्यामुळे आग काही प्रमाणात विझली होती.

२२ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेचे फुटेज डग्लस काउंटी शेरीफ कार्यालयाने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हा आकडा वाढतच आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकdogकुत्रा