शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: माणुसकीला सलाम! पाण्याच्या थेंबासाठी माकडाची वणवण, मग पोलिसानं केलं मन जिंकणारं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 12:45 IST

उन्हाळा सुरू झाल्यानं तापमानाचा पाराही झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसांचीही अवस्था बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याचं अनेकदा दिसून येतं

उन्हाळा सुरू झाल्यानं तापमानाचा पाराही झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसांचीही अवस्था बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याचं अनेकदा दिसून येतं, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मुख्य रस्त्यांवर येऊन पोहोचतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. अशा व्हिडिओंनी मन हेलावतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस हवालदार तहानलेल्या माकडाला पाणी देताना दिसत आहे.

सध्या एका पोलीस हवालदाराचा तहानलेल्या माकडाला पाणी देत ​​असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे बघून सगळ्यांच्याच हृदयाला पाझर फुटला. हा व्हिडिओ मुंबई-अहमदाबाद मार्गावरील माळशेज घाटातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार उष्णतेनं त्रासलेल्या माकडाचा जीव वाचवण्यासाठी त्याला पाणी पाजत असल्याचं दिसून येतं. माकडही बाटली धरून तहान भागवताना दिसत आहे. माकड ज्यापद्धतीनं आणि वेगानं पाणी पिताना दिसतंय त्यावरुन त्याला ते किती तहानलेलं होतं हे लक्षात येतं. माकडाची तहान भागवून त्याचा जीव वाचवल्याबद्दल वाहतूक पोलीसाचंही कौतुक केलं जात आहे. 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी, 'जेथे शक्य असेल तेथे दयाळू व्हा. कॉन्स्टेबल संजय घुडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे', असं कॅप्शन दिलं आहे. 

आतापर्यंत या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओवर व्ह्यूज आणि लाईक्सचा पाऊस सुरू आहे. माकडाला पाणी देणाऱ्या पोलीस हवालदाराचं यूजर्स कौतुक करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया