शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जुगाड म्हणून चक्क गाईच्या पोटाला स्क्रिन बनवून सिनेमा बघत बसले; IPS अधिकारी म्हणाले....

By manali.bagul | Updated: December 25, 2020 13:14 IST

Trending Viral News in Marathi : सिनेमाचं वेड आणि देशी जुगाड यांची पराकाष्ठा आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल गावच्या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या  मैदानात स्क्रिन लावली जाते. रात्रीच्यावेळी पडद्यासमोर बसून लोक सिनेमा पाहण्याचा आनंद घेतात. सध्या  सोशल मीडियावर सिनेमा पाहण्यासाठी केलेल्या जुगाडाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिनेमा पाहण्यासाठी स्क्रिन म्हणून चक्क गाईला उभं केलं आहे आणि गाईच्या पोटावर सिनेमा पाहत आहेत. 

आयपीएस अधिकारी दिपांसू काबरा यांनी हा ट्विटरवर हा फोटो शेअर करत गमतीदार कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता लोक बसून गाईच्या पोटावर सिनेमा पाहत आहेत. गाईच्या पोटावर प्रोजेक्टर लावले आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. आईपीएस दिपांसू यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आफ्रिकेचा असण्याची शक्यता आहे.

आईपीएस ऑफिसर दीपांशु काबरा यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, सिनेमाचं वेड आणि देशी जुगाड यांची पराकाष्ठा आहे. देवा  २०२० लवकर संपू दे.  ही पोस्ट २४ डिसेंबरला  शेअर करण्यात आली होती. आतापर्यंत ४०० जास्त लाईक्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत. काही लोकांनी हा फोटो फारच गमतीदार असल्याचे म्हटलं आहे. लोकांनी या  फोटोवर एकापेक्षा एक रिएक्शन्स दिल्या आहेत. 

 जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती गाय

ओडिशाच्या (Odisha) मलकनगिरी (Malkangiri) शहरातील एका गायीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले होते.  वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जखमी वासराला दवाखान्यात नेण्यासाठी एका हातगाडीवर ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना गाईबाबत खूप वाईट वाटत आहे. कारण आपल्या जखमी वासराला घेऊन जाताना एका हातगाडीच्या मागे ही गाय धावत आहे. गाईचा जीव आपल्या वासरासाठी कासावीस होत आहे. दोन व्यक्ती हातगाडीवरून या वासराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, या वासाराची आईदेखील त्यांच्या मागे धावताना दिसत आहे. सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेगवान वाहनाच्या मध्ये आल्याने वासरु जखमी झाले होते. त्यानंतर लोकांनी याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात माहिती दिली होती. तसेच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यु-ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.  सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहे. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह

टॅग्स :cowगायSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके