शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

इडलीला आईसक्रिम स्टीकवर लावले, आता डोश्याला तरी सोडा; त्यातही घातलं आईसक्रीम, नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 20:04 IST

वेगळ्या प्रयोगांमुळे काहीवेळा पदार्थ अधिकच चविष्ट बनतो तर अनेकदा हा प्रयोग पूर्णतः फसतो. सध्या अशाच एका पदार्थावर करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होणारी ही डिश पाहून लोक हैराण झाले आहेत.

जगभरात अनेक लोक असे असतात ज्यांना चविष्ट पदार्थांसोबत (Tasty Food) अनेक प्रयोग करायला आवडतात. अनेकदा या वेगळ्या प्रयोगांमुळे हा पदार्थ अधिकच चविष्ट बनतो तर अनेकदा हा प्रयोग पूर्णतः फसतो. सध्या अशाच एका पदार्थावर करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होणारी ही डिश पाहून लोक हैराण झाले आहेत.

तुम्ही बटाटा, पनीर, चिकन हे पदार्थ वापरून डोसा बनवल्याचं अनेकदा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला डोशामध्ये आईस्क्रीम टाकल्याचं पाहिलंय का ? सध्या जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, त्यात दिसतं की एक व्यक्ती डोशामध्ये आईस्क्रीम आणि चॉकलेट टाकत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दुकानदार डोशाचं बॅटर आधी तव्यावर टाकतो. हे तो अगदी व्यवस्थितपणे तव्यावर पसरवतो. यानंतर तो यावर आईस्क्रीम आणि चॉकलेट सिरप टाकतो. यानंतर तो चॉकलेट बारीक करून डोशावर टाकतो. थोड्या वेळानंतर तो या डोशाचे छोटे पीस करून ते ग्राहकांना देतो.

हा व्हिडिओ ट्विटरवर @vijaysheth नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यासोबत रागातील इमोजीही पोस्ट केला गेला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला राग कमेंटमध्ये व्यक्त करत आहेत.

एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, आईस्क्रीम, चॉकलेट आणि डोसा...तिन्हींसोबत अत्याचार आहे. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, कुठून येतात असे लोक. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, चवदार पदार्थांसोबत असं करणं चुकीचं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर