शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे", डेट ठरली निष्फळ, मुलाने मुलीला पाठवले बिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 13:08 IST

"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे म्हणते मुलाने मुलीला बिल पाठवले आहे. 

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाइन होत असतात. ऑनलाइन डेटिंगच्या देखील अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत, यावरून अनेक कपल्स आपला जोडीदार शोधत असतात. कपल्स एकत्र वेळ घालवण्यासाठी विविध ठिकाणी फिरायला जात असतात. मात्र आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाऊनही ती डेट निष्फळ ठरली की अनेकांची चिडचिड होते. सध्या अशाच एका व्यक्तीचा वेळ वाया गेल्यामुळे त्याने भन्नाट शक्कल लढवली आहे. डेट निष्फळ झाल्यानंतर एका व्यक्तीने मुलीला इनव्हॉइस पाठवून वेळ वाया घालवल्याबद्दल भरपाई मागितली आहे.  मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मियाना नावाच्या मुलीने स्वत: टिकटॉकवरील व्हिडीओद्वारे याबाबत खुलासा केला आहे. संबंधित तरूणीने व्हिडीओ शेअर करत याबद्दल भाष्य केले आहे. तिने एकदा एका मुलाला डेट केले होते आणि नंतर डेट निष्फळ ठरली आणि वेळ वाया गेला म्हणून मुलाने तिच्याकडून 2,600 रुपयांची भरपाई मागितली आहे. नेटकऱ्यांनी या मुलाच्या या स्टाईलवर केवळ आश्चर्यच व्यक्त केले नाही तर त्याच्या भन्नाट शैलीचे कौतुक देखील केले जात आहे. 

वेळ वाया घालवल्याचे मागितले पैसेदरम्यान, तरूणीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. टिकटॉक युजर्सने म्हटले की तिला एक प्रिंटेड इनव्हॉइस मिळाले आहे, जे तिने वेळ वाया घालवला म्हणून देण्यात आले आहे. मुलीने सांगितले, "मी त्याला मेसेज करून सांगितले होते की यापुढे आपले काहीही होऊ शकत नाही." मुलीचा मेसेज पाहताच संतापलेल्या मुलाने चक्क भरपाई मागितली. यानंतर जेवणासाठी 1,500 रुपये आणि ड्रिंक्सचे 1,100 रुपये असे एकूण 2,600 रुपये बिल मुलाने पाठवले. लक्षणीय  बाब म्हणजे ही गोष्ट पैशाची नाही, तर तत्त्वांची आहे, असेही मुलाने स्पष्ट केले. 

मुलाच्या कृत्यावर नेटकरी फिदामुलाने तरूणीकडून बिलाचे पैसे वसूल केल्यामुळे नेटकरी संबंधित मुलाचे कौतुक करत आहेत. कमेंटमधून हिरोची उपमा देत खोचक टोला देखील लगावला जात आहे. एका युजरने मजेशीर टिप्पणी करत लिहले की, आता वेळ वाया घालवल्याबद्दल मी माझ्या एक्सला देखील बिल पाठवीन. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाbillबिलMONEYपैसा