शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डोकाऊ लागला पोपट, या खोडसाळ मिठ्ठुची गंमतच न्यारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 18:46 IST

ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ पद्धतीने कॅमेऱ्यात वाकुन बघताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं. तेव्हा तो वारंवार कॅमेऱ्यासमोर पाहत राहतो.

सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे .ज्यामध्ये पोपट ट्रॅफिक कॅमेऱ्यावर फोटोबॉम्बिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘कॅसी’ नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत १ हजार ३०० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कुठूनतरी उडत उडत हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसला. आणि त्याला या कॅमेऱ्यात काहीतरी विशेष वाटले, म्हणून तो कॅमेऱ्यात सारखं डोकावताना आपण पाहू शकतो. 

ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ पद्धतीने कॅमेऱ्यात वाकुन बघताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं. तेव्हा तो वारंवार कॅमेऱ्यासमोर पाहत राहतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. १३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक पोपट डोके उलटे करून कॅमेरामध्ये डोकावताना दिसत आहे. कदाचित या पोपटाला कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये स्वत:चाच चेहरा दिसत असल्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच पोपट सारखा या कॅमेऱ्यात डोकावून पाहाताना दिसतो.

तुम्ही ट्रॅफिक पाहत असताना, पुढच्याच क्षणी एक पोपट अचानक कॅमेऱ्याचे दृश्य ब्लॉक करतो. या पोपटाची मान आणि मोठ मोठे डोळे कॅमेऱ्यासमोर येतात. सर्वात मजेदार गोष्ट तेव्हा घडते जेव्हा पोपटाचा चेहरा, त्याच्या मोठ्या डोळ्यांनी, कॅमेरामध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. तो पुन्हा कॅमेराच्या लेन्ससमोर येतो. हा पोपट या कॅमेऱ्यात काहीतरी शोधण्याचाच प्रयत्न करत असल्याचं आता नेटकरी म्हणत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाcctvसीसीटीव्हीInstagramइन्स्टाग्रामBrazilब्राझील