शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Viral Song Video: Pakistani मुलीच्या 'दिल ये पुकारे आजा...'ला टक्कर देतोय मुंबईकर पोराचा भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 20:06 IST

लग्नाच्या मंडपातला डान्स झटक्यात झाला तुफान व्हायरल

Pakistani Girl vs Mumbai Boy Viral Song Video: काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी तरूणीने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा..' या प्रसिद्ध गाण्यावर शानदार डान्स केला होता. हा डान्स पाकिस्तानातच नाही तर भारतातही व्हायरल झाला होता. लाखो लोकांना हे गाणे खूप आवडले आणि इंस्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते अजूनही ट्रेंड करत आहे. लग्नात पाकिस्तानी नवरीने केलेला डान्स मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला आणि सोशल मीडियावर इतका गाजावाजा झाला की लोकांनी तिच्या डान्स स्टेप्स रिक्रिएट करायला सुरुवात केली. अशातच मुंबईकर तरूणानेही डान्‍स स्टेप्स रिक्रिएट करत त्याचा व्‍हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईच्या पोराने जिंकली अनेकांची मनं

पाकिस्तानी मुलीप्रमाणे डान्स कॉपी करत मुंबईतील एका व्यक्तीने डान्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडीओदेखील काही दिवसांतच तुफान व्हायरल झाला. युजर अर्सलन खानने त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे, 'जेव्हाही मी इंस्टाग्राम स्क्रोल फीड रिफ्रेश करतो, तेव्हा मला हेच दिसते, त्यामुळे मी विचार केला की मी देखील असा एक व्हिडीओ बनवावा'. त्यामध्ये, तुम्ही अर्सलनला व्हायरल डान्स परफॉर्मन्स पुन्हा तयार करताना पाहू शकता. तसेच त्याचे मित्र शेजारी बसून त्याला चीअर करत आहेत. त्याची प्रचंड ऊर्जा आणि पाऊल पाहून लाखो लोक व्हिडीओचा आनंद लुटताना दिसत आहेत.

व्हिडिओवर लाखो प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी कमेंट बॉक्समध्ये टाळ्यांचा एक इमोजी शेअर केला आणि त्याचे जोरदार कौतुक केले. पाकिस्तानी तरूणीप्रमाणेच अर्सलाननेही हिरवा रंगाचा पोशाख परिधान केला आहे. त्याच्या प्रोफाइलमध्ये दिलेल्या बायोनुसार, तो भारतातील मुंबईत राहतो. तीन दिवसांपूर्वी ही क्लिप इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली होती आणि तेव्हापासून 3.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिली. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावर नेटिझन्सकडूनही अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. एका यूजरने लिहिले की, 'यार तू खूप चांगला आहेस, मी ५० वेळा पाहिला असेल.' अशाच कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स व्हिडीओ दिसत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड