शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

या पाकीस्तानी मुलीच्या सौंदर्यावर फिदा झाले नेटकरी, जाणून घ्या कोण आहे ही व्हायरल गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 20:23 IST

पाकिस्तानच्या एका सुंदर मुलीचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, ज्यात ही मुलगी चपात्या बनवत आहे, तर कधी बटाटे कापत आहे. या मुलीचं नाव अमिना रियाझ, याच अमिनाचा अजून व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कपडे धुताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या एका सुंदर मुलीचा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल, ज्यात ही मुलगी चपात्या बनवत आहे, तर कधी बटाटे कापत आहे. या मुलीचं नाव अमिना रियाझ, याच अमिनाचा अजून व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती कपडे धुताना दिसत आहे. अशाच एका मुलाचाही व्हिडीओ समोर आला होता, जो पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चहाच्या दुकानात काम करत होता, त्याच्या सौंदर्यानेही जगाला वेड लावले. त्याचे निळेशार डोळे आणि मनमोहक हास्यावर जगभरात तरुणी घायाळ झाल्या. असाच अमिनाचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे, ज्यात तिच्या क्युट स्माईलवर नेटकरी फिदा झाला आहेत.

घरातील कामाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी या व्हिडीओमध्ये वेगळेच काही आहे. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा सलवार सूट आणि काळ्या रंगाचा दुपट्टा घातलेली एक मुलगी कपडे धुत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, तिने डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. आधी तिचं लक्ष्य कपडे धुण्यावर आहे. नंतर ती कपडे खाली ठेवून वर पाहते. तेव्हा तिला कळतं की, कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे, त्यानंतर ती हसते. लोक तिच्या प्रेमळ स्माईलवर फिदा झाले आहेत. तुम्ही बघू शकता की मुलगी दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचे डोळे पण खूप सुंदर आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ekiya5 नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ४३ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीची ओळख १५ वर्षीय अमिना रियाझ अशी आहे, जी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते आणि ती भटक्या कुटुंबातून येते.

आमीनाचा हा पहिलाच व्हिडीओ आहे असे नाही, जो खूप व्हायरल झाला आहे. याआधीही त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सुंदर चिमुरडीचा चपात्या बनवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्याचा टरबूज कापतानाचा एक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. तिच्या या सर्व व्हिडिओंमध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तिचे गोंडस हास्य, ज्याचे जगभरातील लोक कौतुक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम