शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

Pakistan News: पाकिस्तानी महिला अँकरने टीव्ही शोमध्ये विचारले असे प्रश्न, आता लोक उडवताहेत खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:26 IST

Pakistani Anchor Nida Yasir viral Video: पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील अँकर निदा यासिर हिची सध्या सोशल मीडिया युझर्सकडून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील अँकर निदा यासिर हिची सध्या सोशल मीडिया युझर्सकडून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत आहे. (Pakistani Anchor Nida Yasir viral Video) निदा यासिर हिने आपल्या मुलाखतीमध्ये असे काही म्हटले होते की, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. ( Pakistan News) एवढेच नाही तर पाकिस्तानमध्येही तिच्या मुलाखतीच्या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. नेमकं काय प्रकरण आहे, ते आता जाणून घेऊयात. (Questions asked by a Pakistani female anchor in a TV show, now people are laughing)

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अँकर निदा यासिर दोन जणांची मुलाखत घेत आहे. यादरम्यान, फॉर्म्युला -१ रेज कारचा उल्लेख होतो. त्यावर निदा जे काही म्हणते ते ऐकून पाहुण्यांनीही डोक्याला हात लावला. फॉर्म्युला -१ बाबत निदा जे काही म्हणते ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. फॉर्म्युला-१ रेस कारबाबत निदा पाहुण्यांना जे प्रश्न विचारते की, त्यांना हसणे रोखता येत नाही. निदा त्यांना विचारते की, या गाडीमधून किती लोक येऊ शकतात. तर कधी विचारते की, तुम्ही आता लहान गाडीपासून सुरुवात केली आहे का. यावर पाहुणे म्हणतात की, ही फॉर्म्युला-१ कार आहे. त्यामुळे यामध्ये एकच माणूस बसू शकतो. त्यावर अँकर निदा यासिर म्हणते की, हा तर तुम्ही आताच फॉर्म्युला तयार केला आहे. तुम्ही आतापर्यंत त्याची चाचणी घेतली आहे की नाही. शेवटी ती त्या पाहुण्यांना विचारते की, ही गाडी नेमकी किती वेगाने धावते.

मात्र निदा यासिर हिची ही मुलाखत खूप जुनी आहे. ज्याची क्लिप आता व्हायरल होऊ लागली आहे. समा न्यूज वेबसाईटच्या म्हणण्यानुसार गुड मॉर्निंग पाकिस्तान कार्यक्रमाची होस्ट निदा तिच्या शोमधील एक जुनी क्लिप व्हायरल झाल्याने ट्विटरवर टॉप ट्रेंड बनली आहे. तिची ही मुलाखत २०१६ मध्ये प्रसारित झाली होती.

सध्यातरी ३५ सेकंदांची क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप ट्विटरवर एका व्यक्तीने अकाऊंटवर शेअर केली आहे. कार्यक्रम होस्ट करण्यापूर्वी या महिलेने फॉर्म्युला-१ बाबत गुगलवर सर्च का नाही केलं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओवर युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMediaमाध्यमे