शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Viral Video: उंटाला निर्दयीपणे मारहाण करत होता, मुक्या प्राण्याने घेतला असा बदला की पुन्हा हिम्मत करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:34 IST

मारहाण करणाऱ्या आपल्या मालकाला उंटाने चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्याला केलेल्या मारहाणीचा त्याने खतरनाक बदला घेतला आहे.

उंट पाळीव प्राणी. तसा तो शांत म्हणजे माणसांवर हल्ला करताना दिसत नाही. पण जर कुणी त्याच्या वाकड्यात शिरलं तर तो सहनही करून घेत नाही. अशाच एका चवताळलेल्या उंटाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मारहाण करणाऱ्या आपल्या मालकाला उंटाने चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्याला केलेल्या मारहाणीचा त्याने खतरनाक बदला घेतला आहे (Camel attack on man video).

चारा चरत असलेल्या या उंटावर त्याच्या मालकाने कारणाशिवाय मारहाण केली. त्यामुळे शांत असलेला उंट अचानक चवताळला आणि त्याने मालकावर हल्ला केला. उंटाने माणसावर केलेल्या हल्ल्याचं भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहून जसा अंगावर काटा येतो अगदी तसाच काटा उंटाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ पाहून येतो.

व्हिडीओत पाहू शकता काही उंट चरताना दिसते आहे. एक व्यक्ती एका उंटाजवळ येते आणि त्या उंटाला मारायला जाते. कदाचित ही व्यक्ती या उंटाचा मालक असावी. सुरुवातीला उंट अगदी शांत दिसतो आहे. मालक जवळ आला तरी तो शांत उभा आहे. पण जेव्हा मालक त्याला मारायला हात वर करतो तेव्हा मात्र उंटाला राग अनावर होतो. तो चवताळतो आणि मालकावर हल्ला करतो.

उंटाचं असं रूप पाहून मालकही घाबरतो. उंटापासून स्वतःला वाचवण्यासाठी तो जीव मुठीत धरून पळतो. उंटही त्याच्या मागेमागे धावतो. मालकाला उंट पळव पळव पळवतो. शेवटी त्याला जमिनीवर पाडतो. त्यावेळी भऱपूर धूळही उडालेली दिसते. त्या धुळीत फक्त उंटच दिसतो. त्याचा मालक गायबच झाला आहे. तो जमिनीवर तसाच पडला असावा. त्याला धडा शिकवल्यानंतर उंट कुठे थोडा शांत होतो. उंटाने व्यक्तीवर केलेला हल्ला पाहून तिथं असलेले इतर लोकही घाबरतात. ते त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येतात.

@iftirass ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कोणत्याही कारणाशिवाय कुणाच्या वाकड्यात शिरू नये, नाहीतर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हाच धडा आपल्यालाही या व्हिडीओतून मिळतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया