शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

ऑर्डर केला लॅपटॉप, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला धक्का! वाचा नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:14 IST

सध्या ई-कॉमर्सच्या कंपन्या वाढल्या आहेत. यावरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण वाढले असून या कंपन्या ऑफर्सही मोठ्या प्रमाणात देत आहेत.

सध्या ई-कॉमर्सच्या कंपन्या वाढल्या आहेत. यावरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण वाढले असून या कंपन्या ऑफर्सही मोठ्या प्रमाणात देत आहेत. पण ई-कॉमर्सवरुन अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  फ्लिपकार्टवर सेलमध्ये एका व्यक्तीने गेमिंग लॅपटॉपची ऑर्डर दिली आणि ऑर्डर मिळाल्यावर तो बॉक्स उघडला तर ग्राहकाला धक्काच बसला.

घरी आलेला बॉक्स उघडल्यानंतर यात लॅपटॉप नाही तर एक मोठा दगड असल्याचे समोर आले. फ्लिपकार्ट सेलमध्ये कर्नाटकातील मंगळूर येथे राहणाऱ्या चिन्मय नावाच्या व्यक्तीने गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला. ऑर्डर मिळाल्यानंतर बॉक्स उघडला असता त्या बॉक्समध्ये संगणकाचे काही जुने भाग आणि काही ई-कचरा पडून असल्याचे दिसून आले.

WhatsAppचे वाजले बारा; युजर्संनी भन्नाट मीम्स केल्या शेअर

मंगलोरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या व्याक्तीने ही माहिती ट्विटवरून दिली. चिन्मयने १५ ऑक्टोबर त्याच्या मित्रासाठी Asus TUF गेमिंग F15 गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला आणि २० ऑक्टोबर रोजी लॅपटॉप पोहोच झाला.

हे फ्लिपकार्ट प्लस अॅश्युअर्ड होते, पण यासोबत ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय उपलब्ध नव्हता. बॉक्स बाहेरून चांगला दिसत होता, त्यामुळे त्याने डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओटीपी सांगितला. बॉक्स उघडताच ही गोष्ट लक्षात आली. 

आसूसचा बॉक्स उघडून पाहिला असता त्या बॉक्समध्ये संगणकाचे काही जुने भाग व दगडांसह ई-कचरा पडून असल्याचे दिसून आले. या बॉक्समध्ये दगडही ठेवण्या आला होता.

यानंतर त्याने फ्लिपकार्टकडे तक्रार केली. पण फ्लिपकार्टने विक्रेत्याशी संपर्क साधला तेव्हा विक्रेत्याने हे स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. आम्ही लॅपटॉप व्यवस्थित पाठवला होता असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFlipkartफ्लिपकार्टlaptopलॅपटॉप