शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

Optical illusion: पहिलं झाडं दिसलं की प्राणी? लगेचच कळेल तुमच्या पर्सनॅलिटीतचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:28 IST

कधी यात झाडांमध्ये व्यक्तींचा चेहरा दिसून येतो, तर दोन व्यक्तींच्या मध्ये तिसऱ्याच (Optical illusion images) प्राण्याचा चेहरा. सध्या तुमच्यासमोर असलेल्या चित्रामध्येही झाडासोबत काही प्राणी दडलेले दिसून येतील.

ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion) या प्रकारची चित्रं तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. या चित्रांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची आणखी चित्रं दडलेली असतात. साधारणपणे पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला यातील केवळ एक गोष्ट दिसून येते. मात्र, नीट निरखून पाहिल्यास तुम्हाला यात आणखी चित्रं दिसू लागतात. कधी यात झाडांमध्ये व्यक्तींचा चेहरा दिसून येतो, तर दोन व्यक्तींच्या मध्ये तिसऱ्याच (Optical illusion images) प्राण्याचा चेहरा. सध्या तुमच्यासमोर असलेल्या चित्रामध्येही झाडासोबत काही प्राणी दडलेले दिसून येतील.

अशा प्रकारची चित्रं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. लोक मनोरंजनाचं साधन म्हणून या चित्रांकडे पाहतात. असं असलं, तरी या चित्रांच्या माध्यमातून लोकांच्या स्वभावाबाबतही माहिती (Optical Illusion can tell your Personality) मिळू शकते. सध्या आपल्या समोरच्या चित्राचं उदाहरण घेऊया. या चित्रात प्रथमदर्शनी तुम्हाला एक झाड दिसेल. मात्र, नीट निरखून पाहिल्यास या झाडाच्या एका बाजूला गोरिल्ला माकड, दुसऱ्या बाजूला सिंह तर खालच्या बाजूला दोन मासे दिसून येतील. सर्वांना या चित्रात पहिल्यांदा झाडच दिसेल असंही नाही. कित्येकांना अगोदर गोरिल्ला किंवा अन्य प्राणीही दिसू शकतात. तुम्हाला या चित्रात पहिल्यांदा काय दिसतं, यावरुन तुमचा स्वभाव (Guessing Personality with Optical illusion) ओळखता येतो. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सर्वांत अगोदर झाड दिसलं तरबहुतांश लोकांना या चित्रात सर्वांत आधी झाड दिसेल. तुम्हीही त्यांपैकी एक असाल, तर तुम्हाला टापटिप आणि पद्धतशीर राहणं पसंत आहे असं समजावं. यासोबतच तुमच्यात नेतृत्त्वगुण आहेत. तुम्ही कोणत्याही अडचणींवर सहज मात करू शकता हे स्वभावगुण तुमच्यात आहेत.

अगोदर सिंह दिसला तरजर या चित्रात तुम्हाला सर्वांत आधी सिंह दिसला, तर तुम्ही अगदी धैर्यवान व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या लक्ष्यावर नजर ठेवून असता, आणि इतर गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत. तुम्ही कोणत्या वेळी काय निर्णय घ्याल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.

आधी गोरिल्ला दिसला तरजर तुम्हाला या चित्रात सर्वांत आधी गोरिल्ला माकड दिसलं, तर तुम्ही स्वतःसोबत इतरांवरही टीका करणारी व्यक्ती आहात. तुम्हाला वेळेचा अपव्यय आजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला कायम कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून ठेवता ही तुमची स्वभाववैशिष्ट्यं आहेत.

सर्वांत आधी मासे दिसले तरवरच्या सर्व गोष्टी सोडून, सर्वांत आधी तुम्हाला चित्रातील मासे दिसले, तर तुम्ही स्व‍च्छंदी स्वभावाची व्यक्ती आहात. जीवनाकडे तुम्ही अगदी सकारात्मक दृष्टीने पाहता. तुमच्यासाठी स्वतःपेक्षा इतर लोक जास्त महत्त्वाचे असतात असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे तुम्हाला चित्रात कोणती गोष्ट अगोदर दिसते, त्यावरून तुमचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया