सोशल मीडियावर अनेक वयाने लहान-मोठे यूजर्स असे असतात, जे ऑप्टिकल इल्यूजन फोटो दिसण्याची वाट बघत असतात किंवा ते स्वत:हून ऑप्टिकल इल्यूजन फोटो शोधून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. कारण या फोटोतील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच मजा येते. तसेच यातील गोष्टी शोधणं एक मोठं चॅलेंजच असतं. सोबतच टाइमपासही चांगला होतो. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे तोही 10 सेकंदांमध्ये.
आपणही अनेकदा कन्फ्यूज करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिले असतील आणि त्यातील गोष्टी किंवा वेगळा नंबर शोधण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. जेव्हा आपण ठरलेल्या वेळेत फोटोतील गोष्टी शोधल्या असतील तर आनंदाने उड्याही मारल्या असतील. तशीच संधी आजही आपल्याला मिळू शकते. आपल्यासमोर असलेल्या फोटोत आपल्याला सगळीकडे 171 हा नंबर दिसत आहे. पण याच 171 च्या गर्दीत 111 हा नंबर लपलेला आहे. जो आपल्याला 10 सेकंदात शोधायचा आहे. चला तर मग लागा कामाला.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे हे फोटो बघत असताना किंवा यांमधील गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदूची चांगली कसरतही होते. इतकंच नाही आपली आयक्यू टेस्टही होते. मजेदार बाब म्हणजे सगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो काही एकसारखे किंवा कंटाळवाणे नसतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींमध्ये नंबर शोधायचे असतात, काहींमध्ये प्राणी किंवा वस्तू, तर काहींमध्ये फरक शोधायचे असतात. त्यामुळे या फोटोंमध्ये लोकांचा इंटरेस्ट अधिक दिसतो.
आपल्याला जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 10 सेकंदांमध्ये फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर नाराज किंवा निराश होऊ नका. यावेळी जर आपल्याला यश मिळालं नाही तर नंतर पुढच्या वेळी नक्की मिळेन. हा नंबर कुठे आहे हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण यातील वेगळा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला आहे.
Web Summary : Optical illusions challenge viewers to find hidden elements, like a number amidst similar ones, within a time limit. This tests observation skills and provides entertainment, offering a fun way to exercise the brain and improve focus. Try to find 111 amongst 171s.
Web Summary : ऑप्टिकल भ्रम देखने वालों को एक समय सीमा के भीतर छिपे हुए तत्वों, जैसे कि समान लोगों के बीच एक संख्या, को खोजने की चुनौती देते हैं। यह अवलोकन कौशल का परीक्षण करता है और मनोरंजन प्रदान करता है, जो मस्तिष्क का व्यायाम करने और फोकस में सुधार करने का एक मजेदार तरीका प्रदान करता है। 171 के बीच 111 खोजने का प्रयास करें।