ऑप्टिकल इल्युजन असलेली अनेक फोटो व्हायरल होत असतात. तुम्हीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर असे फोटो अनेकदा पाहिलेही असतील. ज्यात काही चित्र दडलेली असतात आणि तेच शोधून दाखवणं हा तुमच्यासमोरचा टास्क असतो. ही असली कोडी अगदी डोक्याचं दही करुन करुन टाकतात राव इतकं मात्र नक्की. पण या कोड्यांचा फायदा असा आहे की यामुळे तुमच्या डोळ्यांचा आणि मनाचा चांगला व्यायाम होतो.
ऑप्टिकल इल्युजन असलेली चित्रं अशा प्रकारे तयार केली जातात की लोक हे आव्हान सहजपणं पूर्ण करू शकत नाहीत. तुम्हाला जर बुद्ध्यांक वाढवायचा असेल तर ब्रेन टीझर सोडवायला सुरुवात करावी असं म्हणतात. सध्या आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन टेस्ट आणली आहे आणि ती नक्कीच एक खेळ तसंच मनोरंजन म्हणून फायद्याची ठरेल. चित्रात तुम्हाला अनेक रंगीबेरंगी फुलं दिसतील. या फुलांच्या ढिगात कलाकारानं चतुराईने ५ स्टार लपवले आहेत. आता तुमच्यासमोरचं टास्क हेच आहे की तुम्हाला हे स्टार ३० सेकंदात सापडले तरच तुम्ही सुपर जीनियस आहात असं म्हणता येईल. मग उशीर कशाचा? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
खालील चित्रातून पाच स्टोर शोधून दाखवा
हे पाहा इथं लपलेत ५ स्टार...