Optical Illusion : तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल की, समोरच असलेली एखादी गोष्ट तुम्ही शोधत आहात, पण ती तुम्हाला दिसत नाही. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यांना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. म्हणजे हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर यातील समोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी यातील फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मांजर दिसत आहे. जी उंदराला शोधत आहेत. उंदीर मांजरीच्या जवळच लपून बसला आहे. पण मांजरीला काही तो दिसत नाहीये. हाच उंदीर तुम्हाला शोधून काढायचा आहे. ज्यासासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. तसेच या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. तुमची आयक्यू टेस्ट होते आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कळून येतो. अशात तुम्हाला तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर लगेच कामाला लागा आणि उंदराला शोधा.
तुम्हाला जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात यातील उंदीर सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत उंदीर कुठं लपला आहे हे बघू शकता.
वरच्या फोटोत उंदीर सर्कल केला आहे.