Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या फोटोंपैकी एक असतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी सॉल्व करण्यात किंवा गोष्टी शोधण्यात लोकांना मजा येते. म्हणूनच रोज सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो कन्फ्यूज करतात. पण सोबतच याद्वारे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला सगळीकडे 1008 हा नंबर दिसत आहे. यात तुम्हाला याच्या उलटा म्हणजे 8001 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्टही करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि एकाग्र मन हवं. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण शकाल. जर तुम्ही बारकाईने हा फोटो पाहिला तर नक्कीच ठरलेल्या वेळात तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.
जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 8001 हा नंबर शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे.