Interesting Facts : लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. रिकाम्या वेळेत लोक आपल्या आवडी-निवडीच्या गोष्टी करतात. कुणी सिनेमे बघतं, तर कुणी एखादा खेळ किंवा व्हिडीओ गेम खेळतात. तर काही लोक रिकाम्या वेळेत टाईमपास करण्यासाठी पत्ते खेळतात. आताची तरूणाई फार पत्ते खेळताना दिसत नाहीत. पण आधीच्या लोकांसाठी पत्ते खेळणं सगळ्यात चांगला टाईमपास होता. लोक ग्रुपने पत्ते खेळण्याचा आनंद घेतात. आजही घरातील बरेच वृद्ध लोक पत्ते खेळत बसतात. आपणही कधी ना कधी पत्ते खेळले असालच. पण पत्त्यांमधे एक वेगळेपण असतं. ज्याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. तेच आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
चारपैकी एक राजा वेगळा दिसतो
जर आपण पत्ते खेळत असाल तर आपल्याला माहीत नसेलच एक पत्ते एकूण ५२ असतात. पत्ते ४ - ४ च्या सेटमध्ये असतात. ज्यांवर क्लब, स्पेड्स, डायमंड आणि हार्ट्स काढलेले असतात. या पत्त्यांमध्ये चार राजे बादशाह म्हणजे राजे असतात. या चार राजांपैकी एक राजा सगळ्यात वेगळा असतो. पण त्याकडे फार कुणी लक्ष देत नाहीत. आम्ही ज्या राजाबाबत सांगतोय तो किंग ऑफ हार्ट्सचा आहे. बाकीच्या तीन राजांना मिश्या तर असतात, पण किंग ऑफ हार्ट्स म्हणजे बदामच्या राजाला मिश्या नसतात.
एका राजाला मिश्या का नसतात?
पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिश्या नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts. King of Hearts नावाने एक सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव दाखवला गेला होता. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हार्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला.
technology.org या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एक आख्यायिका म्हणजे पत्ते हे ब्रिटनमध्ये फ्रान्समधून आले. असे म्हणतात की, सुरूवातीला बदामच्या राजाला मिश्या होत्या. कारण फ्रान्समध्ये वास्तविक राजांवरूनच यांचं चित्रण केलं गेलं होतं. आणि १५ व्या शतकात चार्ल्स राजाचा फोटो बदामच्या राजासाठी देण्यात आला होता. नंतर पुढे लाकडाच्या ब्लॉकने प्रिंटींग करताना आणि इतरही काही कारणांनी या राजाची मिशी गायब झाली आणि कुऱ्हाडही गायब झाली.
Web Summary : Playing cards hold hidden details. The King of Hearts is unique because he lacks a mustache, unlike the other kings. Initially, he had one, but a redesign error removed it. Some link it to French royalty.
Web Summary : ताश के पत्तों में छिपे हैं कई रहस्य। हुकुम का राजा बाकी राजाओं से अलग है क्योंकि उसकी मूंछें नहीं हैं। पहले उसके मूंछें थीं, लेकिन एक डिज़ाइन त्रुटि के कारण हट गईं। कुछ लोग इसे फ्रांसीसी शाही परिवार से जोड़ते हैं।