Gym Viral Video: बॉडी बनवण्यासाठी आजकाल अनेकजण जीममध्ये जातात. पण, काही उत्साही कार्यकर्ते जीममध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतात. काहीवेळा अशा तरुणांसोबत जीवघेणा अपघातही घडतो. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बेंच प्रेस मारताना दिसतोय, त्याच्यासोबत जे घडते, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या पत्नीसोबत जिममध्ये हेवी बेंच प्रेस करताना दिसतो. तो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजेच तब्बल 165 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करतो. पण, हे वजन त्याच्याकडून उचलले जात नाही, त्याचा गळा जड बारबेलखाली अडकतो. एवढे वज गळ्यावर पडल्यामुळे त्याला काहीच हालचाल करता येत नाही. त्याची पत्नी तात्काळ त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण तिलाही वजन उचलता येत नाही.
बराच प्रयत्न केल्यानंतर तो तरुण बारबेलमधून बाहेर योतो. या घटनेत त्या तरुणाच्या गळ्याला जबर मारल लागला, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. हा धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. दरम्यान, हा व्हिडिओ जिम करणाऱ्या सर्वांसाठी एक शिकवण आहे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करू नये किंवा योग्यरित्या करावा, अशी शिकवण हा व्हिडिओ देतो.
व्हिडिओ व्हायरलइंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यू मिळाले आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्या तरुणावर टीका करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याची गरज नव्हती. महिलेला सोबत घेऊन व्यायाम कशाला करायचा? सोबत एखाद्या पुरषाला ठेवायला हवे होते, अशाप्रकारच्या कमेंट्स अनेक युजर्स करत आहेत.