शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अरे व्वा! युट्यूबवर सगळ्यात जास्त कमाई करतोय ९ वर्षांचा चिमुरडा; २०२० मध्ये कमवले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 16:11 IST

Trending News in Marathi : ९ वर्षीय रेयान काजी यंदा यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा निर्माता कंटेंट क्रिएटर (Year's Highest-Paid YouTuber) ठरला आहे.

यु-ट्यूबवर आपलं कौशल्य दाखवून त्यातून उत्पन्नाचा मार्ग निर्माण केलेली अनेक उदाहरण दिसून येतात. कारण जगातील कोणत्याही ठिकाणी असताना युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपला व्हिडीओ इतरांपर्यंत पोहोचवता येतो. फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार, ९ वर्षीय रेयान काजी यंदा यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा निर्माता कंटेंट क्रिएटर (Year's Highest-Paid YouTuber) ठरला आहे.

रेयान काझीने 2020 मध्ये आपल्या YouTube चॅनेलवर 29.5 दशलक्ष डॉलर्ससह सर्वाधिक कमाई केली. यासह, तो यूट्यूबवरील सर्वाधिक कमाई करणारा कंटेंट क्रिएटर  बनला आहे. रेयानच्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे “रेयान्स वर्ल्ड” आहे. रेयान काझी, ज्याचे खरे नाव रेयान गुआन आहे. 2015 मध्ये जेव्हा तो चार वर्षांचा होते तेव्हा त्यानं YouTube व्हिडिओ बनविणे सुरू केले.

रेयान त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विविध विज्ञान संबंधित  DIY प्रयोग करतो आणि बाजारात येत असलेल्या  नवीन खेळण्यांचा आढावा घेतो. याशिवाय तो आपल्या चॅनेलवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट सादर करतो. रेयानच्या पालकांनी २०१५ मध्ये हे चॅनेल सुरू केले आणि आता याला ५ वर्षे झाली आहेत परंतु त्यानंतरही त्यांचे २२.७ दशलक्षाहूनही अधिक सबसक्रायबर्स आहेत.  याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

आज तिसरीच्या वर्गात शिकणारा रेयान आपल्या आईवडिलांबरोबर ९ यूट्यूब चॅनेल्स चालवितो. त्याचे बरेच व्हिडिओ एक अब्जाहूनही जास्त वेळा पाहिले गेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रेयानने  यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. १ नंबर जुगाड! पठ्ठ्यानं एम्बॅसेडर कारला बैलगाडी बनवलं; अन् आनंद महिंद्रा म्हणाले...., पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके