शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

News Anchor Video: बापरे! टीव्ही अँकर LIVE शोमध्ये अचानक कोसळली, डोकं टेबलावर आपटलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 19:10 IST

ती हळूहळू खाली सरकल्यासारखी वाटली, शरीराचा तोल गेला, अचानक डोळे बंद झाले.

News Anchor fall down, Video: टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना अँकर एलिसा कार्सन ऑन एअर बेशुद्ध पडल्याची घटना नुकतीच घडली. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अँकर एलिसा कार्सन शेवोर्ट्ज शनिवारी सकाळी ७ वाजता हवामानाची माहिती देण्याच्या व्हिडिओमध्ये दिसत होती. बोलताना ती अचानक बेशुद्ध पडली आणि त्याच वेगाने जमिनीवर कोसळली. यानंतर त्याच्यासोबत कार्यक्रम करत असलेले दोन अँकर घाबरले आणि ही अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. या घटनेनंतर तिने ब्रेक घेतला. पण लाइव्ह दरम्यान अँकर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

स्टुडिओमध्येच घडला प्रकार

एलिसा कार्सन अमेरिकेतील सीबीएस या वृत्तवाहिनीत तिच्या सहयोगी अँकरशी बोलत होती. हवामानाचा अहवाल देण्यापूर्वी एलिसाचे डोळे अचानक बंद होऊ लागले. तिला काहीतरी होतंय हे व्हिडीओ पाहून नक्कीच समजू शकते. तिच्यासोबत नक्की काय झाले हे नीट कळलं नाही. पण ती हळूहळू खाली सरकल्यासारखी वाटली, तिच्या शरीराचा तोल गेला, अचानक डोळे बंद झाले नि डोकं स्टुडिओमध्ये ठेवलेल्या बेंचवर आदळून ती खाली पडली. लाइव्ह टीव्हीवर तिच्यासोबत बसलेल्या दोन सहयोगी अँकरनी सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. पण नंतर, एक अँकर निशेल मदिना हिने एलिसाने नाव घेत तिच्याबद्दल चिंता व्यक्त केल्याचे दिसले. पाहा Video:

लाईव्ह न्यूज शो दरम्यान ब्रेक घ्यावा लागला!

एलिसा खाली कोसळल्यानंतर अँकर किम म्हणाली, "आम्ही एलिसाला बघून येतो. तुम्हाला माहित आहे की आपण लगेचच भेटणारोत, परंतु आत्ता आम्ही विश्रांती घेतो." तथापि, ब्रेकनंतर, एक रेकॉर्डेड शो प्रसारित केला गेला.

एलिसाने फेसबुकवर दिली अपडेट

काही तासांनंतर, लाइव्ह शो दरम्यान बेशुद्ध झालेल्या एलिसाने फेसबुकवर तिची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 2014 मध्ये एलिसा दुसऱ्या चॅनलमध्ये काम करत होती. त्यावेळीही लाइव्ह शोदरम्यान तिच्यासोबत अशीच एक घटना घडली होती. मात्र, ती बेशुद्ध होण्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया