शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"हे असं शहर ज्याचा मूड गर्लफ्रेंडपेक्षा वेगाने बदलतो"; भाजप नेत्याच्या विधानाने रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:45 IST

नागालॅंडचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना आपल्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.

कोहिमा: नागालॅंडचे भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना आपल्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांचे छोटे डोळे यांपासून ते सलमान खानच्या लग्नापर्यंत त्यांनी अनेक ट्विट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मंत्री महोदय खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या आजूबाजूला काही अन्य लोकंही बसली आहेत. 

हा फोटो खुद्द तेमजेन इमना यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. मात्र चर्चा रंगली आहे ती म्हणजे फोटोसोबत लिहलेल्या भन्नाट कॅप्शनची. "कोहिमा या शहराच्या पावसाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार! हे असं शहर आहे ज्याचा मूड तुमच्या गर्लफ्रेंडपेक्षा वेगाने बदलतो", या मजेशीर कॅप्शनमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे. 

तेमजेन इमना यांची रंगली चर्चा 

कोहिमा नागालॅंडची राजधानी असून एक सुंदर शहर म्हणून त्याची जगभर ख्याती आहे. येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने या शहराला भेट देत असतात. नागा टेकड्यांवर वसलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत, जी पाहून जगभरातील पर्यटक मंत्रमुग्ध होतात. दरम्यान, नागालॅंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेमजेन यांनी याआधी देखील अनेक मजेदार ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले होते. भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण म्हणून माझ्यासारखे सिंगल राहा, असा त्यांनी दिलेला अजब सल्लाही खूप व्हायरल झाला होता.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलnagaland-pcनागालँडBJPभाजपाViral Photosव्हायरल फोटोज्