शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"माझी बायको ४ महिन्यांची गरोदर"; भर लग्न मंडपात नवरदेवानं केलेल्या वक्तव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:14 IST

लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर आपली होणारी बायको गरोदर असल्याची बातमी देणारा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

नवी दिल्ली । 

लग्न म्हणजे जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो, त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. एका नवरदेवानं आपल्या लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना एक अनोखं सरप्राइज दिलं आहे. "माझी होणारी बायको ४ महिन्यांची गरोदर आहे", असं सांगून नवरदेवानं सर्व वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्काच दिला. माझी होणारी पत्नी १६ आठवडे अर्थात ४ महिन्यांची गरोदर असून लवकरच माझ्या बाळाची आई होणार असल्याचं नवरदेवानं जाहीरपणे सांगितलं. लक्षणीय बाब म्हणजे वधू आणि वरानं हे सरप्राइज लग्नाच्या दिवसासाठी गुपित ठेवलं होतं. 

दरम्यान, नवविवाहित जोडप्यानं याचा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. "आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. लग्नासाठीचं ठिकाण ठरवण्यापासून ते सर्व सुरळीत पार पाडण्यासाठी खूप कष्ट घेतले. मात्र आजचा आनंदाचा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे, कारण माझी होणारी बायको गरोदर आहे आणि आम्ही लवकरच एका बाळाचे आई-बाबा होणार आहोत", असं नवरदेवानं जाहीर केलं. 

'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, या नवदाम्पत्याचे नाव टेलर आणि डॅन स्ट्रॉटन असं आहे. "आमच्या लग्नात येणाऱ्या पाहुणे मंडळीसाठी एक सरप्राइज ठेवलं होतं. आमच्या घरात नवीन पाहुण्याच आगमन सप्टेंबर २०२२ मध्ये होणार आहे याची माहिती सर्वांना दिली", असं टेलरनं टिकटॉवर एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.  

विशेष म्हणजे या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये डॅन स्ट्रॉटन आणि टेलर लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेव डॅन यानं टेलर चार महिन्यांची गरोदर असल्याचं जाहीर केलं.

लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर आपली होणारी बायको गरोदर असल्याची बातमी देणारा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्संनी विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अभिनंदन केलं आहे. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नpregnant womanगर्भवती महिला