शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या लोकलमध्ये रेस्टॉरंट! दोन तरुणांची अनोखी शक्कल, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:12 IST

नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबई लोकलमध्ये दोन तरुणांनी अनोखा प्रयोग केला आहे.

Viral Video: सध्या मुंबईतील दोन तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या तरुणांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चक्क फाईव्ह स्टार रेस्टॉरंट सुरु केलं आहे. लोकल हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जास्तीत जास्त मुंबईकर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात.

मुंबईची लोकल आणि गर्दी हे समीकरण मुंबईकरांना अंगवळणी पडलेलं आहे. रहदारीच्या वेळी तर लोकलमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसते. लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. पण या लोकलमध्ये चक्क रेस्टॉरंट सुरू करण्याचा कुणी विचार तरी करु शकेल का? पण दोन तरुणांना ही हटके कल्पना सुचली आणि त्यांनी चक्क लोकलमध्येच चालतं-फिरतं रेस्टॉरंट सुरू केलं. लोकलच्या डब्यात छोटे आणि तात्पुरते रेस्टॉरंट उघडून त्यांनी प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

सोशल मीडियात याचा व्हिडिओ व्हायरल होत असून या तरुणांनी आपल्या नव्या स्टार्टअपची माहिती दिली आहे. आर्यन कटारिया आणि सार्थक सचदेवा अशी या तरुणांची नावे आहेत. दरम्यान या युनिक स्टार्टअपला त्यांनी 'टेस्टी टिकट' असं नाव दिलं आहे. व्हिडिओमध्ये हे दोघं तरुण आपल्या नव्या व्यवसायाची माहिती देणारं इनव्हाइट कार्डचं वाटप करतानाही दिसतात. 

मुंबईकर प्रवासी काय म्हणाले? या दोन तरुणांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही जेव्हा आमच्या नव्या स्टार्टअपचे इनव्हाइट कार्ड प्रवाशांना दिलं, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून आम्ही भारावून गेलो'. मुंबई लोकलमध्ये अशा पद्धतीचा व्यवयाय सुरू केला जाऊ शकतो, ही कल्पना सर्वसामान्य प्रवाशांना मान्यच नव्हती. 

प्रवाशांनी घेतला जेवणाचा आस्वादसोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हे दोन तरुण प्रवाशांना गरमा-गरम जेवण सर्व्ह करताना दिसून येत आहेत. जिलबी, मॅगी सोबत टोमॅटो सॉस इतकेच नाही तर स्वीट डिशचा सुद्धा त्यात समावेश आहे. त्यातील काही हौशी प्रवाशांना या तरुणांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

येथे पाहा व्हिडिओ: 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम